
zee marathi : झी मराठीवर 'नवा गडी नवं राज्य' (nava gadi nava rajya)_ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला ८ ऑगस्टपासून येणार आहे. रमा आणि आनंदीच्या संसाराची गोड गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल. या मालिकेत प्रमुख भूमिकेत अनिता दाते (anita date), पल्लवी पाटील (pallavi patil) आणि कश्यप परुळेकर सोबतच साईशा भोईर असणार आहेत. या मालिकेचा ग्रँड प्रीमियर शो नुकताच पार पडला. यावेळी अनेक तारे तारकांनी हजेरी लावली होती. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अनिता दाते प्रमुख भूमिकेत आहेत.
झी मराठीने टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदांच मालिकेच्या निमित्ताने दिव्य प्रीमियर सोहळा मुंबईमध्ये आयोजित केला होता, यावेळी मालिकेचे सर्व कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. अनिता दाते, पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर यांनी आनंद व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "आम्ही या प्रीमियरसाठी खूप उत्सुक होतो कारण मराठी मालिकेचा असा भव्य प्रीमियर होणं हे कदाचित पहिल्यांदाच होत असेल. यासाठी आम्ही व आमच्या सर्व टीमने खूप मेहेनत घेतली. प्रीमियर बघून आम्ही खूप खुश झालो आहोत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमची ही आगळीवेगळी मालिका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच स्थान मिळवेल."
'नवा गडी नवं राज्य' म्हणजे एकीकडे संसारात मन अडकलेली रमा आणि दुसरीकडे रामाच्या पश्चात संसार सावरणारी आनंदी यांची ही गोष्ट आहे. आता रमा आनंदीला सहकार्य करणार की तिच्या मार्गात अडथळा आणणार हे लवकरच कळेल. पण आनंदीही संसार सांधण्याचा चंग बांधताना प्रोमो मध्ये दिसते आहे. अनिताने या मालिकेशी संबंधित एक फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. ज्यात तिच्या फोटोला हार घातला होता. यावर अनेकांना तिचं निधन झालं का अशी शंका आली होती पण नव्या भूमिकेचा हा प्रमोशनल स्टंट होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.