लेखक डोक्यावर आपटलाय का? 'नवा गडी नवं राज्य' मालिकेवर प्रेक्षक भडकले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nava gadin ava rajya zee marathi new serial trolled after ghost scene angry reactions from audience

लेखक डोक्यावर आपटलाय का? 'नवा गडी नवं राज्य' मालिकेवर प्रेक्षक भडकले..

nava gadi nava rajya : आज ओटीटी सारखे सशक्त माध्यम आले तरी वाहिन्यांवरच्या दैनंदिन मालिकांचे महत्व कमी झालेले नाही. या मालिका घराघरात पाहिल्या जात असल्या तरी तरी मालिकांच्या बाबतीत खटकणाऱ्या भागांवर प्रेक्षक सोशल मिडियावर जाऊन थेट प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. असाच अनुभव सध्या झी मराठी वाहिनीला आलेला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेवर प्रेक्षकांनी सडकून टीका केली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. (nava gadin ava rajya zee marathi new serial trolled after ghost scene angry reactions from audience )

झी मराठीवर नुकतीच 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका रात्री 9 वाजताच्या स्लॉटला सुरू झाली. या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. पण मालिकेत नुकताच एक भाग असा दाखवण्यात आला जो पाहुन प्रेक्षक भडकले आहेत. काही दिवसात मालिकेचं कथानक पुढे सरकताच प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते रमाची भूमिका साकारत आहेत. रमाचा मृत्यू झाला आहे. पण ती तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच राघवच्या दुसऱ्या बायकोला, आनंदीला दिसते. ती कधी आनंदीची फजिती करते, तर कधी तिच्या मागे पुढे करताना दिसते. गणपती विशेष भागात तर आनंदी रमाचा ओवसा भरते असेही दाखवण्यात आले होता. पण नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला त्यावरून ही मालिका वादात अडकली.

या प्रोमोत असेल दाखवले आहे की, रामरक्षा स्त्रोत्र म्हटल्यानंतर रमा घाबरते आणि पळून जाते. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिकेला चांगलेच ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणतो, 'रमाचं भूत सुहासिनीचा ओवसा घेतं. गणपतीच्या दर्शनाला येतं आणि मग रामरक्षा म्हटल्यावर का भीतं माहिती नाही.' तर आणखी एका युझरनं म्हटलं आहे की, 'ती गणपतीच्या पाया पडली, पुजेला बसली तेव्हा काही झालं नाही आणि मंत्र बोल्ल्यावर काय झालं? कसं एवढं बावळट बनवता रे?' एका नेटकऱ्याने तर लेखकावरच निशाणा साधला आहे,तो म्हणतो. 'लेखक डोक्यावर पडलाय सगळी गोष्टच विसंगत आहे कश्याचा कशाला मेळ नाही'. सध्या हा प्रोमो आणि त्यावर होणारी टीका हा चर्चेचा विषय झालेला आहे.

Web Title: Nava Gadi Nava Rajya Zee Marathi New Serial Trolled After Ghost Scene Angry Reactions From Audience

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..