नवाझुद्दीन सिद्दीकीने पत्नी आलियाला पाठवली नोटीस

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

नवाजुद्दीनने अखेर त्याचं मौन सोडत घटस्फोटाची नोटीस पाठवणा-या पत्नी आलियाला आता बदनामी केल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. 

मुंबई- नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया सिद्दीकी यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणाने आता एक नवीन वळण घेतलंय. नवाजुद्दीनने अखेर त्याचं मौन सोडत घटस्फोटाची नोटीस पाठवणा-या पत्नी आलियाला आता बदनामी केल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. 

हे ही वाचा: आषाढी एकादशीनिमीत्त सावनी रविंद्र करतेय, पहिल्यांदाच ऑनलाइन लाईव्ह कॉन्सर्ट​

नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकिल अदनान शेख यांच्याद्वारे पाठवलेल्या कायदेशीर नोटीसनुसार, आलिया सतत खोट्या गोष्टी सांगून आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करुन प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. याचकारणामुळे नवाजने आता आलियाच्या विरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा करत केस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवाजुद्दीनचे वकिल अदनान शेख यांनी आलियाने केलेल्या आरोपांचं खंडंन केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून घराचा हफ्ता न भरणे, मुलांच्या शाळेची फी  आणि त्यांच्या मेेटेंनन्सचा खर्च न देणे असे आरोप आलियाने नवाजवर केले होते जे नवाजच्या वकिलांनी चूकीचे असल्याचं म्हटलं आहे. नवाजुद्दीन द्वारे पाठवल्या गेलेल्या नोटीसमध्ये आलियाच्या या गोष्टीचा उल्लेख केला आहे की नवाजुद्दीनने आत्तापर्यंत आलियाच्या नोटीसचं उत्तर का नाही दिलं. मात्र नवाजच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, आलियाने ६ मे रोजी नवाजला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर १५ दिवसांत या नोटीसवर उत्तर देणं गरजेचं होतं.

नवाजुद्दीन तर्फे या नोटीसचं उत्तर डिसोल्युशन ऑफ मॅरेजनुसार १९ मेला देण्यात आलं होतं. मात्र तरीही नवाजुद्दीनने नोटीसला उत्तर न दिल्याचं मिडियामध्ये सांगत त्याच्या इमेजला धक्का पोहोचवण्याचा ती प्रयत्न असल्याचं ते सांगतात. या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, आलिया सतत खोटं बोलून त्याच्या इमेजला झक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आलियाने यासाठी लिखित स्वरुपात माफी मागण्याती गरज आहे आणि हे सगळे आरोप मागे घ्यायला हवेत असं नवाजच्या वकिलांचं म्हणणं आहे. 

nawazuddin siddique breaks his silence on wife aliya siddiques sends defamation notice  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nawazuddin siddique breaks his silence on wife aliya siddiques sends defamation notice