
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने इंडस्ट्री गाजवल्यानंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकी आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी याने शनिवारी सुपरस्टार व्यंकटेशसोबत त्याचा पहिला तेलुगू डेब्यू चित्रपट 'सैंधव'( Saindhav) ची घोषणा केली. नवाजुद्दीनने ट्विटरवर अनेक फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली. शैलेश कोलानू दिग्दर्शित या चित्रपटात राणा डग्गुबती आणि नागा चैतन्य देखील दिसणार आहेत.
या फोटोत नवाजुद्दीन सिद्दीकी चित्रपटाच्या सेटवर व्यंकटेश, राणा दग्गुबती आणि नागा चैतन्य आणि इतरांसोबत पोज देत आहे. तर दुसऱ्या फोटोत व्यंकटेश आणि नवाजुद्दीन हात एकत्र आहेत.तर शेवटच्या फोटोत नवाजुद्दीनने हनुमानाच्या फोटोजवळ प्रार्थना करतांना दिसत आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सर्वात ऊर्जावान व्यक्ती असलेल्या व्यंकटेश दग्गुबतीच्या 75व्या चित्रपट 'सैंधव'सोबत काम करणे खूप छान आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोलानू करत आहेत. तेलुगुमध्ये पदार्पण करण्याच्या दिशेने...'
शैलेशने नवाजुद्दीनसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने लिहिले की, 'आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक नवाजुद्दीन सिद्दीकी भेटल्याने खूप आनंद झाला आहे. हे खुप वेडसर होणार आहे, मी तुम्हाला खात्री देतो.'
सैंधव हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये व्यंकटेश मुख्य भूमिकेत आहेत. निहारिका एंटरटेनमेंट या बॅनरखाली वेंकट बोयनपल्ली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर संगीत संतोष नारायणन यांनी दिले आहे.
मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'हड्डी' हा आगामी चित्रपट येणार आहे, त्याचबरोबर तो 'टीकू वेड्स शेरू', 'बोले चूड़ियां', 'जोगीरा सा रा रा रा' आणि 'अफवाह' मध्येही दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.