esakal | 'बॉलीवूडमध्ये घराणेशाहीची नाही तर वर्णभेदाची खरी समस्या'
sakal

बोलून बातमी शोधा

'बॉलीवूडमध्ये घराणेशाहीची नाही तर वर्णभेदाची खरी समस्या'

'बॉलीवूडमध्ये घराणेशाहीची नाही तर वर्णभेदाची खरी समस्या'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा बॉलिवुडचा (bollywood) दमदार अभिनेता आहे. त्याच्या अभिनयासमोर दिग्गज कलाकारही फिके पडतात. फक्त भारतातच नव्हे तर जगभर त्याच्या अभिनयाचा डंका आहे. तर नुकतचं नवाजला सुधीर मिश्राच्या सीरियस मेन या चित्रपटामधील अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय EMMY नामांकन मिळाले आहे. त्यावेळी नवाज आपले मत व्यक्त करत म्हणाले, फिल्म इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीपेक्षा वर्णभेदाची समस्या जास्त आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे विचारप्रवाह आले आहेत. त्याचा परिणाम कलाकार आणि कलाकृती यांच्यावर होताना दिसतो. त्यामुळे कित्येक कलाकार त्याच्याविरोधात आवाज उठवताना दिसतात.

यापूर्वी अभिनेत्री स्वरा भास्कर, कंगना राणावत, तापसी पन्नु यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली होती. बॉलीवूडमध्ये दरवेळी एकाच गटाला मिळणार प्राधान्य याविषयी अभिनेता नवाझुद्दीननं आपलं मत व्यक्त केलं आहे. बॉलिवूड हंगामासोबतच्या मुलाखत मध्ये तो म्हणाला, "सुधीर साब यांना सिनेमाबद्दल प्रचंड ज्ञान आहे आणि त्यांची विचार करण्याची शैली अतिशय व्यावहारिक आहे. पण जर इंदिरा तिवारीला पुन्हा लीड म्हणून कास्ट केले तर मला खूप आनंद होईल. सुधीरने तिला कास्ट केलं पण बाकीच्याच काय , आणि मी तुम्हाला हमी देऊ शकतो की आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप वर्णभेद आहे."

मी अनेक वर्षे वर्णभेदाविरोधात लढलो आहे आणि मला आशा आहे की येत्या काळात काळ्या त्वचेच्या अभिनेत्रींना नायिकेचे काम दिले जाईल; खर ती काळाची गरज आहे. इंडस्ट्रीमध्ये एक पक्षपात आहे जो चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी संपणे आवश्यक आहे ... माझ्या रंगामुळे किंवा माझी उंची कमी असल्यामुळे, मला देखिल बरीच वर्षे नाकारण्यात आले होते., आता मी त्याची तक्रार करू शकत नाही. पण इतर अनेक महान अभिनेते आहेत जे अजूनही या प्रकारच्या पक्षपातीपणाला बळी पडतात. ” नवाजने अनेक चित्रपटांमध्ये छोटी भूमिका केल्या आहेत. १९९९ साली त्याने सरफरोश या चित्रपटातून पदार्पण केले.

हेही वाचा: कंगना-नवाझुद्दीन पहिल्यांदाच एकत्र; 'या' सिनेमात दिसणार जुगलबंदी

हेही वाचा: लाईट,साऊंड,कॅमेरा अ‍ॅन्ड अ‍ॅक्शन; नवाझुद्दीन सिध्दिकी पुन्हा एकदा सेटवर

loading image
go to top