नवाझुद्दीन सिद्दीकीच्या भावाकडून प्रकाशन संस्थेविरोधात शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

मुंबई : अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा भाऊ आणि नवोदित दिग्दर्शक शमशुद्दीन सिद्दीकीने एका प्रकाशन संस्थेविरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे. स्त्री कलाकारांसोबत शमशुद्दीनची वागणूक आक्षेपार्ह असल्याचा दावा केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे.

'बोले चुडिया' या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन शमशुद्दीन सिद्दीकी करत आहे. यामध्ये नवाझुद्दीनसोबत अभिनेत्री मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहे. 'संबंधित मीडिया रिपोर्टमध्ये आपली अवमानकारक प्रतिमा उभी करण्यात आली आहे.' असे शमशुद्दीनने याचिकेत म्हटले आहे.

'शमशुद्दीनच्या गैरवर्तनामुळे अनेक अभिनेत्रींनी चित्रपट सोडला' असा दावा संबंधित मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत शमशुद्दीनने त्यांना कोर्टात खेचले आगे. नवाझने मात्र अद्याप याप्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही.

राजेश आणि किरण भाटिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मे-जून महिन्यात या सिनेमाचे चित्रीकरण पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nawazuddin Siddiquis brother files Rs 100 crore defamation suit against publication for maligning his name