esakal | छापेमारीनंतर अभिनेता अरमान कोहली एनसीबीच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

छापेमारीनंतर अभिनेता अरमान कोहली एनसीबीच्या ताब्यात

छापेमारीनंतर अभिनेता अरमान कोहली एनसीबीच्या ताब्यात

sakal_logo
By
युगंधर ताजणे

एनसीबीनं (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ncb अखेर अभिनेता अरमान कोहलीला armaan kohli त्याच्या मुंबईतील mumbai office ऑफिसमधून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी कुणाची नावं समोर येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या सेलिब्रेटी कलाकारांची नावं पुढे आली आहे. आता प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर एनसीबीनं शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. त्यानंतर त्याला त्याच्या ऑफिसमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याच्या अगोदर टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित gaurav dixit याच्यावर कारवाई करुन त्याला एनसीबीनं अटक केली होती. त्याला तीस ऑगस्टपर्यत एनसीबीच्या ncb कोठ़डीत ठेवण्यात येणार आहे.

जानी दुश्मन फेम अभिनेता अरमान कोहलीच्या armaan kohli घरावरही छापा टाकण्यात आला. त्या कारवाईतून पोलिसांना काही वस्तु सापडल्या आहेत. ज्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे. सध्या अभिनेत्याची चौकशी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात एनसीबीकडून कारवाई होताना दिसत आहे. त्यात आतापर्यत अनेकांना अटकही करण्यात आली आहे. अभिनेता एजाज खानलाही एनसीबीनं अटक केल्याचे दिसुन आले आहे. त्याचीही चौकशी सुरु आहे.

एनीसीबीनं अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला होता. त्यात त्यांना काही नशेचे पदार्थ आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांनी त्या अभिनेत्याची चौकशी सुरु केली आहे. यापूर्वी देखील या प्रकरणांमध्ये अनेकांना अटक झाली आहे. त्यांची चौकशीही झाली आहे. मात्र त्यात पुढे फार काही झालेलं नाही. पोलीस त्याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे. बॉलीवूडच्या ए ग्रेड कलाकारांशिवाय टीव्ही कलाकारांवर देखील पोलिसांनी वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक कलाकारांवर पाळत ठेवली जात असल्याची चर्चा आहे. या अगोदर एजाज खानची देखील चौकशी करण्यात आली होती. त्याला अटकही करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून अनेक नावं समोर आली होती. त्याबाबतही तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीचा छापा

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या निमित्तानं बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण पुढे आलं होतं. त्यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींची नावं समोर आली होती. आताही सातत्यानं अंमलीपदार्थांच्या बाबत कलाकारांची नावं पुढं येताना दिसत आहे. या प्रकरणाबाबत सांगायचं झाल्यास, बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या घडामोडी येण्यास सुरुवात झाली होती. त्यात कित्येक प्रसिद्ध सेलिब्रेटींची नावंही समोर आली होती. आता टीव्ही मनोरंजन tv entertainment क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता गौरव दीक्षितला gaurav dixit एनसीबीनं ncb अटक केली आहे. गौरवला आता ३० ऑगस्टपर्यत एनसीबीनं आपल्या ताब्यात घेतलं आहे. गौरवकडून एनसीबीनं एमडी आणि चरस जप्त केलं आहे. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.

loading image
go to top