Maharashtra Politics: म्हणून म्हणते राज ठाकरेंना एकदा मुख्यमंत्री करा! तेजस्विनीला राहवेना Tejaswini Pandit

तेजस्विनीने सुरुवातीला तिने महाराष्ट्रातील राजकारणाची कशी भेळ झालीय हे सांगितलं.
Ncp Ajit Pawar News tejaswini pandit On Maharashtra Political Situation Sharad Pawar wants to make Raj Thackeray Chief Minister
Ncp Ajit Pawar News tejaswini pandit On Maharashtra Political Situation Sharad Pawar wants to make Raj Thackeray Chief MinisterSAKAL
Updated on

Tejaswini Pandit on Maharashtra Politics News: महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झालाय. अजित पवारांनी राष्ट्रवादीशी बँड करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार आणि इतर आमदारांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी जे बंड केलं आणि ४० आमदार त्यांच्यासोबत घेऊन गेले त्या बंडानंतर अजित पवारांचं हे मोठं बंड आहे. आता महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपावर अजून मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पोस्ट केलीय.

(Ncp Ajit Pawar News tejaswini pandit On Maharashtra Political Situation Sharad Pawar wants to make Raj Thackeray Chief Minister)

Ncp Ajit Pawar News tejaswini pandit On Maharashtra Political Situation Sharad Pawar wants to make Raj Thackeray Chief Minister
Vaidehi Parshurami केसांची वेणी, दिसायला सौंदर्याची राणी

तेजस्विनी पंडितने ट्विटरवर एक पोस्ट केलीय. यात सुरुवातीला तिने महाराष्ट्रातील राजकारणाची कशी भेळ झालीय हे सांगितलं. तेजस्विनी लिहिते.. भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!.

आणि मग तेजस्विनीने राज ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. तेजस्विनी लिहिते.. तत्वनिष्ट, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अश्याच माणसानं आता महाराष्ट्रावर “ राज” करावं !!! - महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक अशी पोस्ट तेजस्विनीने लिहिली आहे.

दरम्यान अजित पवारांनी आपल्या 35 आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Ncp Ajit Pawar News tejaswini pandit On Maharashtra Political Situation Sharad Pawar wants to make Raj Thackeray Chief Minister
Maharashtra Politics: नैतिकतेच्या आईचा घो... महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाबद्दल सचिन गोस्वामींची खास पोस्ट

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं आहे.

या सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

DCM Sunetra Pawar
tejaswini pandit on mother death anniversary
Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Marathi News Esakal
www.esakal.com