देशात आणीबाणी लागू करा, लष्कर बोलवाः ऋषी कपूर

वृत्तसंस्था
बुधवार, 1 एप्रिल 2020

देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करा आणि लष्कर बोलवा, अशी मागणी  ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून केली आहे.

मुंबई : देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करा आणि लष्कर बोलवा, अशी मागणी  ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून केली आहे.

सुनिल ग्रोवरच्या 'या' मीम्समुळे चाहते हसून लोटपोट

'आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे?' म्हणूनच आपल्याला लष्कराच्या मदतीची गरज आहे, असे मी म्हणतो आहे, असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे. ऋषी कपूर सातत्याने कोरोना विषाणूविषयी ट्विट करून आपले मत मांडताना दिसत आहेत.

ऋषी कपूर यांनी यापर्वी देशभरात सुरु असलेल्या बनावट आणि अस्वच्छ मास्कच्या उत्पादनावरही प्रश्न उपस्थित केला होता. पत्रकार मधू तेहरान यांचे एक ट्विट रिट्विट करताना तात्काळ कारवाईची मागणी केली होती. शिवाय, लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने नागरिक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकाने सुरु करा, असेही ट्विट केले होते. दरम्यान, ऋषी कपूर हे चर्चेत असून, नेटिझन्स टीका करतानाही दिसत आहेत.

अभिनेत्री जुही परमार कडून शिका घरबसल्या नैसर्गिक साबण कसा बनवायचा ?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: need military out says actor rishi kapoor