esakal | Good News: नेहा धुपिया झाली दुसऱ्यांदा आई
sakal

बोलून बातमी शोधा

neha-dhupia

नेहाचा पती आणि अभिनेता अंगद बेदीने त्यांच्या मुलाच्या जन्माविषयीची बातमी इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

नेहा धुपिया झाली दुसऱ्यांदा आई

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया केवळ तिच्या इंडस्ट्रीतील सर्वोत्तम पात्रांसाठीच नव्हे तर तिच्या बोल्डनेस साठी सुध्दा ओळखली जाते. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. नेहा धुपिया पुन्हा एकदा आई झाली आहे. नेहाचा पती आणि अभिनेता अंगद बेदीने त्यांच्या मुलाच्या जन्माविषयीची बातमी इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत अंगद बेदीने लिहिले, 'देवाने आशीर्वाद म्हणून आम्हाला एक मुलगा दिला आहे. आता नेहा आणि बाळ दोघेही ठिक आहेत. मेहर तिच्या लहान भावाच स्वागत करण्यास सज्ज आहे. बेदी बॉय आला आहे. वाहेगुरू मेहर. आमच्या चौघांसाठी हा क्षण अविस्मरणीय आहे.

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी 2018 मध्ये लग्न केलं. नेहा धुपियाच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'देवी' चित्रपटात दिसली होती. आता नेहा लवकरच 'अ थर्सडे' आणि 'सनक' या चिञपटामध्ये दिसणार आहे.

loading image
go to top