3 महिन्यांपूर्वी लग्न झालेली नेहा धुपिया होणार आई

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नेहा आई होणार असल्याची गुडन्युज तिने ट्विटर व इन्स्टाग्राम वरून दिली आहे. तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेले हे जोडपे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. 

अभिनेत्री नेहा धुपिया व अंगद बेदी यांनी कोणताही गाजावाजा न करता लग्न केले. आता पुन्हा एकदा या जोडप्याकडून गोड बातमी शेअर होत आहे. नेहा आई होणार असल्याची गुडन्युज तिने ट्विटर व इन्स्टाग्राम वरून दिली आहे. तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेले हे जोडपे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. 

 

Here’s to new beginnings ... #3ofUs ....  #satnamwaheguruੴ

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

अंगद बेदी नेहापेक्षा वयाने लहान असल्याने या लग्नाबाबत अनेक चर्चा झाल्या. ती लग्नापूर्वीच गरोदर असल्याने तिने लवकर व गाजावाजा न करता लग्न केल्याचे म्हटले जाते. अखेरीस ती गरोदर असण्याच्या वृत्ताला थेट नेहाकडूनच दुजोरा मिळाला आहे. तिने इन्स्टाग्रामवर व ट्विटरवर 'एक नवी सुरवात...आम्ही तिघं' असे कॅप्शन देत तिचे व नेहाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच अंगद बेदीने ट्विटरवर 'हो..ही अफवा खरी आहे' असे कॅप्शन देऊन त्याचे व नेहाचे फोटो शेअर केले आहेत.  

10 मे रोजी तिचे व अंगद बेदीचे दिल्लीत लग्न झाले होते. नेहा 37 वर्षांची आहे, तर अंगद 35 वर्षांचा म्हणजेच तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.  

Web Title: neha dhupiya and angad bedi shares good news on insta and twitter