
Neha pendse: नाद नाय! नेहा पेंडसे साठी नवऱ्यानं थेट हेलिकॉप्टरच बूक केलं.. तेही मुंबईतल्या मुंबईत फिरायला..
neha pendse: मराठी मनोरंजन विश्वातील एक सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. तिने मराठी सोबत हिंदीतली आपली जादू दाखवली आहे. शिवाय मराठी सर्वाधिक हॉट अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.
सध्या ती अभिनयात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र प्रचंड सक्रिय असते. काही वर्षांपूर्वीच तिने शार्दुल बायस या बड्या उद्योगपती शी लग्नगाठ बांधली. त्यावेळी शार्दुलच्या पहिल्या लग्नाबाबत नेहाला विचारले होते आणि नेहाने थेट मीही व्हर्जिन नाहीय म्हणत सडेतोड उत्तर दिले होते. तेव्हा या विषयाची बरीच चर्चा झाली होती.
सध्या ते दोघे सुखाने संसार करत आहेत. नेहाच्या नवऱ्याचे तिच्यावर इतके प्रेम आहे की तो तिच्यासाठी काहीही करू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्याने नेहासाठी मुंबईतल्या मुंबईत फिरायला हेलिकॉप्टर बूक केलं होतं. नुकतच एका मुलाखतीत नेहा याबाबत बोलली..
(Neha pendse husband shardul bayas booked helicopter for neta to travel nariman point to naigaon)
नेहा नुकतीच प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या कामासोबत वैयक्तिक आयुष्याबाबतही बरच काही सांगितलं. त्यावेळी नेहाने नरीमन पॉइंट ते नायगाव हेलिकॉप्टरने प्रवास केल्याचा खुलासा केला.
हल्ली मुंबईतल्या मुंबईत गाडीने जातानाही लोकांना विचार करावा लागतो पण नेहाने मात्र पती शार्दूलसोबत नरिमन पॉईंट ते नायगाव चक्क हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. आता अशा प्रवासाचे नेमके कारण काय, याचेही उत्तर तिने या टॉकशो मध्ये दिले आहे.
या टॉकशोमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मेननही हजेरी लावली आहे. यावेळी त्यानेही त्याच्या आयुष्यातील एक गुपित उघड केले. 'गल्ली बॉय' चित्रपटातील सिद्धांत चतुर्वेदीने साकारलेल्या एमसी शेर या भूमिकेसाठी सिद्धार्थला विचारणा करण्यात आली होती. आता ती भूमिका त्याच्या हातून का सटकली, यांचा खुलासा सिद्धार्थने केला आहे. असे त्याच्या सोबत अनेकदा घडल्याचेही त्याने सांगितले.
मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.