Netflix: साडेनऊ लाख युझर्सचा दणका! डायरेक्ट 'Unsubscribed'

नेटफ्लिक्सला यावर्षी पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार एप्रिल पासून जुनपर्यत तब्बल साडे नऊ लाख युझर्सनं नेटफ्लिक्सला अनसब्सक्राईब्ड केलं आहे.
Netflix News
Netflix Newsesakal

Netflix News: नेटफ्लिक्सला यावर्षी पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार एप्रिल पासून जुनपर्यत तब्बल साडे नऊ लाख युझर्सनं नेटफ्लिक्सला अनसब्सक्राईब्ड केलं आहे. नेटफ्लिक्स हे जगभरामध्ये सर्वाधिक लोकप्रिय (Entertainment News) असणारे ओटीटी माध्यम आहे. इतर देशांमध्ये नेटफ्लिक्सला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असताना भारतात मात्र त्यांच्या वाट्य़ाला अपयश (OTT News) आल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्सला मोठा दणका बसत आहे. त्या कंपनीच्या सीइओंनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती.

नेटफ्लिक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सच्या (Social Media News) निर्मात्यांनी ही बाब गांभीर्यानं घेतली आहे. यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सनं नेटकऱ्यांसाठी एक वेगळी ऑफर जाहीर केली होती. मात्र त्याला देखील फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नेटफ्लिक्सला अंदाज (Bollywood News) होता की, त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळेल मात्र तसे झाले नाही. नेटफ्लिक्सनं आपल्या शेयर धारकांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आता पुढील वर्षी नेटफ्लिक्सनं वेगेवगळ्या सुविधा देणार असल्याचे सांगितले आहे. त्याचा परिणाम म्हणजे जास्तीत जास्त प्रेक्षक आपल्या ओटीटीकडे वळवण्याचा प्रयत्न असणार आहे.

Netflix News
Netflix पाहाणे होणार आणखी स्वस्त; कंपनी घेऊन येतेय खास प्लॅन्स

काही युझर्सचे म्हणणे आहे की, नेटफ्लिक्सचे जे प्लॅन आहेत ते भलतेच महागडे आहेत. त्याचा परिणाम प्रेक्षकांवर झाला आहे. त्यामुळे येत्या काळात काही ऑफर्स देण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नेटफ्लिकनं म्हणून तर आकर्षक सवलती देखील जाहीर केल्या आहेत. मात्र त्याकडे युझर्सनं लक्ष दिलेलं नाही. नेटफ्लिक्सला काट्याची टक्कर ही अॅमेझॉन प्राईम आणि डिझ्ने हॉटस्टारची आहे. आगामी काळात ही स्पर्धा आणखी तीव्र होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Netflix News
भारताला कमी लेखणं Netflix ला भोवलं; बंद पडण्याची चिन्ह?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com