'मिस युनिव्हर्स' हरनाजने काढला मांजरीचा आवाज; संतापलेले नेटकरी म्हणाले..

हरनाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Steve Harvey  and Harnaaz Sandhu
Steve Harvey and Harnaaz SandhuTwitter

पंजाबच्या हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) 'मिस युनिव्हर्स'चा (Miss Universe) किताब जिंकला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला हा मान मिळाला. याआधी २००० मध्ये लारा दत्ताने हा सौंदर्यस्पर्धेतील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला होता. हरनाजवर संपूर्ण देशातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र या सौंदर्यस्पर्धेतील एका व्हिडीओमुळे नेटकरी नाराज झाले आहेत. हरनाजला स्टेजवर प्राण्याचा आवाज काढायला लावल्याने सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वेवर (Steve Harvey) नेटकरी संतापले आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिस युनिव्हर्स स्पर्धकांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल विचारत असताना, स्टीव्हने हरनाजला एखाद्या प्राण्याचा आवाज काढायला सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या व्हिडिओमध्ये, हार्वेने हरनाजला विचारलं, “मी ऐकलंय की तू काही प्राण्यांचे आवाज हुबेहूब काढतेस. आम्हाला काही ऐकायला मिळेल का?” त्याला उत्तर देताना हरनाज म्हणते, “अरे देवा, स्टीव्ह, या मंचावर मी हे करावं अशी अपेक्षा नव्हती. पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही," अखेर हरनाज मांजरीसारखा आवाज काढून दाखवते.

Steve Harvey  and Harnaaz Sandhu
जॅकलिनच्या कथित बॉयफ्रेंडने जेलमधून घेतली २०० कोटींची खंडणी; असा होता मास्टरप्लॅन

सोशल मीडियावर अनेकांनी हार्वेवर राग व्यक्त केला आहे. 'इतर स्पर्धकांना चांगले प्रश्न विचारले गेले. मात्र भारताच्या हरनाजला प्राण्याचा आवाज काढायला सांगितला. तिच्यासाठी हा प्रश्न कोणी लिहिला होता, हे मला जाणून घ्यायचं आहे', असं एकाने लिहिलं. तर 'इतक्या लोकांसमोर ती तिथे प्राण्यांचा आवाज काढायला गेली नव्हती. हार्वेला असे मूर्खासारखे प्रश्न कोणी विचारण्यास सांगितलं होतं. ती पदव्युत्तर शिक्षण घेतेय आणि अभिनेत्रीसुद्धा आहे. इतकं सगळं असताना असा विचित्र प्रश्नच का विचारला केला', असा सवाल दुसऱ्याने केला.

सुष्मिता सेन आणि लारा दत्तानंतर 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकणारी हरनाज ही तिसरी भारतीय आहे. २१ वर्षीय हरनाजने 'फेमिना मिस इंडिया'चा किताबही जिंकला आहे. तिने काही पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिकासुद्धा साकारल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com