'बिग बॉस'मधून अश्लिलतेचा प्रसार; सलमान खान लक्ष्य

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

सोशल मीडियावर बिग बॉस कार्यक्रमाला ट्रोल करताना म्हटले आहे, की या कार्यक्रमातून अश्लिलतेचा खूप प्रसार करण्यात येत आहे. तसेच बिग बॉस हा कार्यक्रम मनोरंजनासाठी नसून, या कार्यक्रमातून कोणताही चांगला संदेश देण्यात येत नाही.

मुंबई : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या 'बिग बॉस'च्या 13 व्या मोसमात अश्लिलतेचा प्रसार करण्यात येत असल्याचा आरोप होत असून, सोशल मीडियावर बिग बॉसला जिहादी ठरविण्यात आले आहे. तसेच #BlockSalmanKhan, #BanBigBoss हे ट्रेंडही सुरु करण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर बिग बॉस कार्यक्रमाला ट्रोल करताना म्हटले आहे, की या कार्यक्रमातून अश्लिलतेचा खूप प्रसार करण्यात येत आहे. तसेच बिग बॉस हा कार्यक्रम मनोरंजनासाठी नसून, या कार्यक्रमातून कोणताही चांगला संदेश देण्यात येत नाही. देशातील संस्कृती खराब करण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जात आहे. कलर्स वाहिनीवर बॅन आणण्याचीही काही जणांनी मागणी केली आहे. 

तर, दुसरीकडे बिग बॉसच्या समर्थनार्थही काही जण आले आहेत. बिग बॉसमध्ये बेड शेअरिंग या टास्कमध्ये काश्मिरी तरूण आणि हिंदू युवती यांना एकत्र ठेवण्यात आले होते. यावरून या कार्यक्रमाला जिहादी ठरविण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीची ही हानी असल्याची टीका होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमिषा पटेलवरही ओव्हरऍक्टिंगची टीका होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens Trend Boycott Bigg Boss On Twitter Over Ashleelta On The Show