esakal | राजच्या अटकेनंतर सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीवर मीम्स
sakal

बोलून बातमी शोधा

राजच्या अटकेनंतर सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीवर मीम्स

राजच्या अटकेनंतर सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीवर मीम्स

sakal_logo
By
- संतोष भिंगार्डे

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला Raj Kundra अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पती राज कुंद्रा याला अटक झाल्यावर शिल्पा शेट्टी सोशल नेटवर्किंग साइट्सवर टॉप ट्रेंड करत आहे. ट्विटरवर तर नेटकरी राज कुंद्राला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टीला जोरदार ट्रोल करत आहेत. (Netizens troll Shilpa Shetty on Raj Kundras arrest slv92)

इन्स्टाग्रामवरही शिल्पा शेट्टीच्या नावाने भरपूर मीम्स व्हायरल होत आहेत. काही मीम्समध्ये शिल्पा अश्रू पुसताना दिसत आहे, तर काही मीम्समध्ये विविध चित्रपटांमधील लोकप्रिय डायलॉग्सचा संदर्भ राज कुंद्रा याच्या अटकेशी जोडलेला पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामशिवाय ट्विटरवरही युझर्स शिल्पा शेट्टीला टोला लगावत आहेत. ‘बिचारी शिल्पा शेट्टी योगामध्ये व्यस्त होती आणि तिचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवत राहिला...आता राजसाहेब काही दिवस तुरूंगात घालवतील!’ अशी विविध ट्विट्स शिल्पा शेट्टी हा हॅशटॅग वापरून ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.

हेही वाचा: पॉर्न फिल्म्स प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक!

काय म्हणाले पोलीस?

"पॉर्नोग्राफीक चित्रपट बनवून काही अ‍ॅप्सवर प्रदर्शित केले जात असल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आम्ही राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक केली. तोच या प्रकरणात मुख्य कारस्थानकर्ता आहे" अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. राज कुंद्राविरोधात फसवणूक कलम (४२०), (३४) (२९२), (२९३) अश्लील, असभ्य जाहीरात या आयपीसीच्या कलमातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

loading image