मोदींवर पुन्हा बायोपिक! हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार निर्मिती

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

मन बैरागी' नावाचा हा चित्रपट पंतप्रधान मोदींच्या जीवनातील माहीत नसलेल्या पैलूंवर आधारित असणार आहे.

मुंबई : विवेक ओबेरोयने मोदींची भूमिका केलेला चित्रपट आल्यानंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे ही मोदींचा बायोपिक तयार करत आहेत. या सिनेमाचं पहिलं पोस्टर आज नरेंद्र मोदीच्या वाढदिवसाला म्हणजेच 17 सप्टेंबरला रिलीज झाले. 'मन बैरागी' नावाचा हा चित्रपट पंतप्रधान मोदींच्या जीवनातील माहीत नसलेल्या पैलूंवर आधारित असणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारनं या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या पोस्टरवर मन बैरागी जब मै मुजसे मिला अशी टॅगलाइन पाहायला मिळत आहे. या सिनेमात नरेंद्र मोदींची भूमिका कोण साकारणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण हा सिनेमा हिवाळ्यापर्यंत प्रेक्षाकांच्या भेटीला येईल असं पोस्टरवर दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित असेलेल्या या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि महावीर जैन मिळून करत आहेत. या सिनेमाची कथा संजय त्रिपाठी यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new biopic on PM Narendra Modi by Director Sanjay Leela Bhansali