"बेटी बचाओ, बेटी पढाओ"चा नारा आता चित्रपटातूनही; लवकरच होणार प्रदर्शित

संतोष भिंगार्डे
Sunday, 16 August 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशात "बेटी बचाओ बेटी पढाओ" घोषणा दिली होती. या घोषणेने प्रभावित होऊन बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील चित्रपट निर्माते बी. एस. जोगदंड यांनी या विषयावर ''लाडली बेटियां'' हा  चित्रपट तयार करायचे ठरवले आहे.

मुंबई : गेली अनेक वर्षे आपल्या देशात महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण या गोष्टींबाबत अनेक माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशात "बेटी बचाओ बेटी पढाओ" घोषणा दिली होती. या घोषणेने प्रभावित होऊन बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील चित्रपट निर्माते बी. एस. जोगदंड यांनी या विषयावर ''लाडली बेटियां'' हा  चित्रपट तयार करायचे ठरवले आहे. त्यांनी स्वत: या चित्रपटाची कथा आणि चित्रपटामधील चार गाणी लिहिली आहेत. या सर्व गाण्यांना संगीतकार वैष्णव देवा यांनी संगीत दिले आहे.  उदित नारायण, कुमार शानू, वैशाली माडे आणि दलिया मित्र यांच्या मधुर आवाजात सर्व गाणी रेकॉर्ड झाली आहेत.

हरित लवादाचा बड्या कंपन्यांना जबरजस्त दणका; या कारणांमुळे ठोठावला कोटींचा दंड

वैष्णव देवा यांना या चित्रपटाची कथा इतकी आवडली की त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बी. एस. जोगदंड यांना विनंती केली की  मलाच या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची परवानगी द्यावी. निर्माते जोगदंड यांना वैष्णव देवाच्या कामावर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी वैष्णव देवा यांच्यावर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवली. त्यानंतर लगेचच वैष्णव देवा यांनी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले.

निसर्ग नंतर मासेमारीला पुन्हा वादळाचा तडाखा; नव्या हंगामाचा मुहुर्त लांबला; अद्याप मासेमारी नौका बंदरातच

युनिव्हर्स इंडिया 2016 हा किताब मिळवलेली अभिनेत्री अलंकीरता बोरा, यश पंडित, सुरेंद्र पाल, हॅरी जोश, बेबी सोनिया आणि शालिनी कपूर हे कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत. उत्तराखंडमधील डेहराडून, मसुरी, हरिद्वार, लक्ष्मण झुला, धनौल्टी येथे या चित्रपटातील रोमँटिक गाण्यांचे तसेच चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते अनंत वेडे डॉ. एच. एम. वेंगे आणि जयसिंग सिंगा आणि चंद्र मोहन पांडे आहेत. 
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new bollywood movie will gives messahe of beti bachao, beti padhao