आईचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका ‘आई कुठे काय करते’

new marathi serial aai kuthe kay karte on star pravah channel
new marathi serial aai kuthe kay karte on star pravah channel

मुंबई : चित्रपट, मालिका आणि वेब सिरिज या माध्यामातून लोकांना जागृत करणारे आणि सामाजिक विषयांवर मेसेज देणारे अनेक विषय समोर येत असतात. सासू-सूनांच्या भांडणांपलिकडे आता मालिकांमधूनही विविध गंभीर विषय हाताळले जात आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य़ आणि अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे 'आई'. प्रेमळ, काळजी घेणारी, सर्व हट्ट पुरवणारी आणि संपूर्ण घर सांभाळणारी घराघरातील आई. असचं तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका आईची कहाणी घेऊन स्टार प्रवाह वाहिने ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घेऊन येत आहेत. 

ऑफिसमध्ये 9-9 शिफ्ट करत नसली तरी दिवस रात्र ती घरातल्या कामात व्यस्त असते. तिच्या या कामांचा हिशोब करणं जवळपास अशक्यच आहे. त्याची परतफेड करणंही कठीण पण कौतुक करणंही आपण विसरुन जातो. अशाच प्रत्येक घरातल्या आईचं महत्त्व पटवून देणारी मालिका ‘आई कुठे काय करते’ स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून सायंकाळी 7.30 वाजता सुरु होत आहे. 

या मालिकेतली आईची मुख्य भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या साकारत आहेत. मालिकेची कथा आहे अरुंधती देशमुखची. इतर कोण्या आईप्रमाणेच ती गेले 25 वर्षे संसाराचा गाडा सांभाळत आहे. मुलांचं संगोपन, सांभाळ, घरातल्या इतर सदस्यांची, सासू -सासरे काळजी आणि नवऱ्याच्या कामाची वेळ हे सर्व ती काटेकोरपणे प्रेमाने सांभाळते आहे.  पण, हे सर्व करुनही तीला 'आई कुठे काय करते?' असा सवाल केला जातो. स्वत:चं अस्तित्व विसरून अनेक गोष्टींचा त्याग करणाऱ्या आईच्या संघर्षाचा उलघडा या मालिकेतून होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhurani gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar) on

यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री मधुराणी या मालिकेच्या निमित्ताने 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com