
दोन फुलपाखरं फडफडली आणि... 'रानबाजार' चा थरारक ट्रेलर
वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' या वेबसिरीजचा 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज १८ मे रोजी या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टिझरवरुन काहीतरी बोल्ड विषय असेल असं अनेकांनी अंदाज बांधला होता. परंतु अत्यंत वेगळ्या धाटणीची अशी वेब सिरिज असणार आहे. यामध्ये राजकीय विश्वासह, गुन्हेगारी जग, पोलिस विश्व असा बराच मोठा आवाका आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हे एक परिपूर्ण मनोरंजन पॅकेज असेल.
नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलर मध्ये अनेक दिग्गज चेहरे पाहायला मिळाले. मोहन आगाशे, उर्मिला कोठारे, आनंद जोग, वनिता खरात, मोहन जोशी, अभिजीत पानसे, मकरंद अनासपूरे, सुरेखा कुडची, वैभव मांगले, सचिन खेडेकर आणि अनेक दिग्गज कलावंत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनीही महत्वाची भूमिका यात बजावली आहे. ही केवळ एक बोल्ड कथा नाही तर राजकीय थरार आहे. जो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता. यामध्ये प्राजक्ता माळी (prajakta mali ) आणि तेजस्विनी पंडित (tejaswini pandit ) अत्यंत बोल्ड लुक मध्ये समोर आल्या. एका दिवसात या टिझरला १० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या टिझरवर प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली असून ‘रानबाजार’ येत्या २० मे पासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Title: New Marathi Webseries Raanbaazaar Trailer Out
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..