esakal | दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी केली ड्रीम प्रोजेक्टची सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh manjarekar

महेश मांजरेकर दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ते त्यांच्या चाहत्यांसाठी नवा सिनेमा घेऊन येणार आहेत.

दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी केली ड्रीम प्रोजेक्टची सुरुवात

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ते त्यांच्या चाहत्यांसाठी नवा सिनेमा घेऊन येणार आहेत. मांजरेकर यांच्या या आगामी सिनेमाच्या शुटींगला नुकतीच सुरुवात झाली आहे. हा एक क्राईम थ्रिलर पठडीतील सिनेमा असेल असं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी ‘एन एच स्टुडिओज’ने स्विकारली आहे. आत्तापर्यंत 'पिंक', 'बेगम जान', 'ओमर्ता' यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती करणारी करणारा हा स्टुडिओ यावेळी पहिल्यांदाच मराठी सिनेमाची निर्मिती करतोय.

हे ही वाचा: सैफ अली खानसोबत तैमुर करतोय शेतात काम, मातीत खेळण्याचा घेतोय आनंद

महेश मांजरेकर हे नेहमीच वेगवेगळे विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. हा सिनेमा देखील त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. या सिनेमाच्या नावाची अजुन घोषणा झालेली नाही.  नुकतंच मुंबईमध्ये या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. २८ ऑक्टोबर रोजी सिनेमाचा पहिला सीन शूट करण्यात आला. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

या सिनेमाबाबत सांगताना महेश मांजरेकर म्हणाले, “गेली कित्येक वर्षं मी या सिनेमाच्या कथेचा विचार करत होतो. माझ्या डोक्यात ही कथा गेली कित्येत वर्ष होती मात्र तिला प्रत्यक्षात उतरवण्याचा योग येत नव्हता. या दरम्यान मी एकदा विजयला भेटलो आणि त्याला ही कथा अगदी सहजच ऐकवली. कथा ऐकता क्षणी विजय इतका खुश झाला, त्याने माझ्याकडे हा सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली. माझी ही कथा विजयने एन एच स्टुडिओजचे निर्माते नरेंद्रजी यांना ऐकवली आणि त्यांनीही या सिनेमाच्या निर्मितीसाठी लगेचच होकार कळवला. आता तर या सिनेमाचं शुटिंगही सुरू झालंय. माझा हा ड्रिम प्रोजेक्ट आता प्रत्यक्षात साकारतोय याचा मला आनंद आहे, ज्यासाठी मी माझे निर्माते आणि सहनिर्माते यांचे मनापासून आभार मानतो.” असं मांजरेकर म्हणाले.

nh studioz turns producer for mahesh manjrekars untitled next