मला बाबा व्हायचंय; निकची प्रियांकाकडे मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोना यांचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला. त्यांच्या विवाहाला काही दिवस होत असतानाच निक जोनाने बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली. ''मला लहान मुले खूप आवडतात. त्यामुळे माझ्या आणि प्रियांकाच्या आयुष्यात एखादे लहान मूल आले तर आम्हाला नक्कीच आवडेल'', असे निक जोनाने एका मुलाखतीत म्हटले आहे.

निक जोनाने एका मुलाखतीमध्ये ही इच्छा बोलून दाखवली. यामध्ये त्याने सांगितले, की ''आयुष्यात मी अनेक चढउतार पाहिले आहेत. या जीवनाने मला कमी वयात खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्यामुळेच आज मी एक जबाबदार व्यक्ती होऊ शकलो''. तसेच निक पुढे म्हणाला, ''मला लहान मुले खूप आवडतात. माझ्या आणि प्रियांकाच्या आयुष्यात एखादे लहान मूल आले तर आम्हाला नक्कीच आवडेल. मी लहान मुलाची जबाबदारी नीट पार पाडू शकतो, असा मला विश्वास आहे. मला लवकरच बाबा व्हायला आवडेल''. 

दरम्यान,  मला आयुष्यात जे काही अनुभव आले ते माझ्या मुलांसोबत शेअर करायला नक्कीच आवडतील. असे झाल्यास हे सगळं माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणेच असेल, असेही निक म्हणाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nick Jonas Talks About Having Babies With Wife Priyanka Chopra