‘भाऊ गेलायं आणि तू मजा करतेय, लाज कशी वाटत नाही?’

निक्कीचा भाऊ केवळ 29 वर्षांचा होता. त्याचे कोरोनानं निधन झाले.
Nikki tamboli
Nikki tamboli Team esakal

मुंबई- बिग बॉस सिझन 14 मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीच्या (Nikki tamboli ) भावाचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे निक्की आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. निक्कीचा भाऊ केवळ 29 वर्षांचा होता. निक्कीने ‘खतरो के खिलाडी’ (khatron ke khiladi) या शोच्या अकराव्या सिझनमध्ये भाग घेतला आहे. या शोच्या चित्रीकरणासाठी निक्की साउथ अफ्रिकेला गेली आहे. भावाच्या निधनानंतर लगेच निक्की फिरायला गेली असल्याने तिला सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. या ट्रोल करणाऱ्यांना निक्कीने सडेतोड उत्तर दिले. (Nikki tamboli get troll after brothers death she is enjoying)

निक्कीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहीले, ’काही मूर्ख लोक मला मेसेज करत आहेत आणि माझ्या फोटोवर कमेंट करत आहेत की माझ्या भावाचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे आणि तू मजा करतेयस? तुला लाज वाटत नाही. तर अशा मूर्खांना मी सांगू इच्छिते की माझं पण स्वत:च आयुष्य आहे. मलादेखील आनंदी राहण्याचा अधिकार आहे, या लोकांकडे काही काम नाही. हे फक्त कमेंट करणं आणि नकारात्मकता पसरवण्याचं काम करतात. अशा लोकांना माझी विनंती आहे की जा तुमची स्वप्न पूर्ण करा. यामुळे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या जीवलगांना आनंद होईल.’

Nikki tamboli replay
Nikki tamboli replayTeam esakal
Nikki tamboli
उधाराची साडी, रबर बँडची अंगठी; १५० रुपयांत पार पडलं अभिनेत्याचं लग्न
Nikki tamboli
लस घेताना घाबरलेल्या अंकिताने घेतलं देवाचं नाव; चाहते म्हणाले..

निक्की लवकरच “खतरो के खिलाडी” या शोमध्ये विविध साहसी स्टंन्ट करताना दिसणार आहे. या शोबद्दल पोस्ट करत निक्कीने लिहीले होते, ‘मी माझ्या आयुष्याच्या अशा वळणावर आहे जिथे एकीकडे माझे कुटुंबीय कठिण काळातून जात आहे आणि दुसरीकडे माझ्या कामाच्या कमिटमेंट आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com