Bigg boss 16: या पुढे बिग बॉसच्या घरात फक्त हिंदीच! इंग्लिश बोलल्यास होणार शिक्षा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nimrit Kaur And Soundarya Sharma Get Punished For Speaking In English

Bigg boss 16: या पुढे बिग बॉसच्या घरात फक्त हिंदीच! इंग्लिश बोलल्यास होणार शिक्षा..

bigg boss 16: सर्वाधिक वादग्रस्त समजला जाणारा शो 'बिग बॉस 16' हा मागील सर्व सीझनपेक्षा वेगळा ठरत आहे. यावेळी बिग बॉस खूप सक्रिय असून घरातील नियम तोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जात आहे. हा हिंदी शो असल्याने इथे कायमच हिंदी बोलण्यासाठी सक्ती केली जाते. जे सतत इंग्रजी भाषेत बोलतात त्यांना समज दिली जाते, पण यंदा थेट शिक्षा करण्याचा निर्णय बिग बॉसने घेतला आहे.

(Nimrit Kaur And Soundarya Sharma Get Punished For Speaking In English)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात अमृता फडणवीस गाणार का? खास एंट्री!

झाले असे की,जेव्हापासून निम्रत कौर अहलुवालिया आणि सौंदर्या शर्मा बिग बॉसच्या घरात आल्या, तेव्हापासून त्या दोघी इंग्रजीतच जास्त बोलत असतात. बिग बॉसच्या घरात इंग्रजीत बोलण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तरीही दोघेही हा नियम मोडतात आणि फक्त इंग्रजीत बोलतात. आता त्याच्या या कृतीवर बिग बॉस त्याना धडा शिकवणार आहेत. कलर्स चॅनलने त्याचा प्रोमो शेअर केला आहे.

बिग बॉस निम्रत आणि सौंदर्याला इंग्रजी बोलल्याबद्दल शिक्षा करताना दिसत आहे. बिग बॉस म्हणतात की, या दोघी भारतात मोठ्या झाल्या तरी यांना हिंदी येत नाही? हिंदी शोमध्ये येऊन हिंदी बोलायला लाज वाटते का?. त्यामुळे बिग बॉस या दोघीना आजपासून केवळ हिन्दीतच बोलायचं अशी आज्ञा देतात सोबत एक टास्क देतात. ज्यामध्ये निम्रत आणि सौंदर्या हात जोडून भारताची माफी मागतात. म्हणतात, 'भारत मे हिन्दी शो मे आयी हू, पर मुझे हिन्दी नही आती. मुझे माफ करो.' शिवाय सर्वांना पुन्हा एकदा इंग्रजीत संवाद साधायचा नही अशी ताकीद दिली जाते. आता शिक्षा करूनही त्या पुन्हा इंग्रजीत बोलतील का ही लवकरच समजेल.

टॅग्स :Big Bossbigg boss