'मला बायपोलर डिसॉर्डर आहे, पण मी वेडी नाही'; निशाचं स्पष्टीकरण

पती करणविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना निशाने मांडली तिची बाजू
Karan Mehra and Nisha Rawal
Karan Mehra and Nisha Rawal

अभिनेता आणि पती करण मेहराविरोधात Karan Mehra पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अभिनेत्री निशा रावलने Nisha Rawal मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली. निशाने करणविरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. "करणचे विवाहबाह्य संबंध असून त्याने याआधीही माझ्यावर हात उचलला होता", असा धक्कादायक खुलासा तिने यावेळी केला. निशाच्या तक्रारीनंतर करणला अटक करण्यात आली. जामिनावर सुटल्यानंतर करणने निशावरही काही आरोप केले होते. "निशाने स्वत: तिचं डोकं भिंतीला आपटलं आणि नंतर माझ्यावर आरोप केले. निशाला बायपोलर डिसॉर्डर असून रागावर तिचं अजिबात नियंत्रण नाही", असे आरोप करणने केले. यावर निशानेही तिला बायपोलर डिसॉर्डर असल्याचं मान्य केलं. (Nisha Rawal accepts she has bipolar disorder says But I am not a psycho)

"बायपोलर हा मूडशी संबंधित डिसॉर्डर असून मानसिक ताणामुळे तो होतो. कधीकधी ते आनुवंशिकसुद्धा असतं. मला बायपोलर डिसॉर्डर होता आणि मी त्याबद्दल खोटं बोलणार नाही. कारण मला त्याची अजिबात लाज वाटत नाही. मी वेडी नाही, तो फक्त मूडशी संबंधित डिसॉर्डर आहे. मी किती संयमी आहे हे तुम्हा सर्वांना माहित आहे. मी वेबसाठी कंटेट तयार करते, व्हिडीओ करते, लेखनसुद्धा करते. मला या गोष्टी सिद्ध करून दाखवायची गरज नाही", असं निशा म्हणाली.

Karan Mehra and Nisha Rawal
त्या रात्री नेमकं काय झालं? जामिनावर सुटलेल्या करणचं स्पष्टीकरण

२०१४ मध्ये गर्भपात झाल्याचंही निशाने यावेळी सांगितलं. "सप्टेंबर २०१४ मध्ये मी पाच महिन्यांची गरोदर होते. त्यावेळी माझा गर्भपात झाला आणि बाळाला गमावलं. त्यावेळी मला करणच्या पाठिंब्याची, त्याच्या प्रेमाची खूप गरज होती. पण तो माझ्याजवळच नव्हता. गर्भपाताचा मानसिक धक्का पचवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं, तेव्हा मी थेरपिस्टकडे जाण्याचा निर्णय घेताल. करणने मला तेसुद्धा करण्यापासून थांबवलं होतं. तो माझ्या प्रत्येक गोष्टींवर बंधनं आणत होता", असं ती पुढे म्हणाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com