Nitesh Pandey Last Post: 'बिखरने का मुझको...',नितेशचा 'तो' व्हिडिओ ठरला शेवटचा! पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Nitesh Pandey Last Post
Nitesh Pandey Last PostEsakal

Nitesh Pandey Last Post: आज टिव्ही मनोरंजन विश्वातुन दोन धक्कादायक बातम्या समोर आल्या. साराभाई वर्सेस साराभाई मध्ये जॅस्मिनची भूमिका करणाऱ्या वैभवी उपाध्यायच्या जाण्यानं चाहत्यांना शोक अनावर झाला.

टीव्ही इंडस्ट्री अजून या धक्क्यातून सावरली नव्हती की नितेश पांडे यांच्या निधनाची बातमी आली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला धक्का बसला.

'अनुपमा' फेम नितेश पांडेने वयाच्या 51 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. शूटिंग सेटवरची ती रात्र त्यांच्यासाठी शेवटची ठरली.

Nitesh Pandey Last Post
Arijit Singh Viral Video: 'कोण म्हणेल याची संपत्ती 7 मिलियन'! अरिजित स्कूटरवर निघाला किराणा घ्यायला..व्हिडिओ व्हायरल

नितेश पांडे इगतपुरी येथे शूटिंग करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना प्राण गमवावे लागले. आता हळूहळू टीव्ही इंडस्ट्रीतील लोकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली दिली आहे.

नितेश पांडे हे स्वतः सोशल मीडिया जास्त सक्रिय नव्हते. ते क्वचितच काही पोस्ट त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतं. त्यांची शेवचटची पोस्ट ही 13 आठवड्यांपूर्वीची आहे.

नितेश यांनी कधी विचारही केला नसावा की ती त्याची शेवटची पोस्ट ठरेल. त्यांनी बाहेरच्या लोकेशनवर एन्जॉय करत असतांना एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Nitesh Pandey Last Post
Kangana Ranaut: 'हा तर संविधानाचा अपमान..',कंगना इतकी का अन् कुणावर भडकली?

जो त्यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 21 फेब्रुवारीला त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला 'बिखरने का मुझको शौक है बडा' हे गाणं वाजत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत त्याचा कुत्राही दिसत आहे. ते या व्हिडिओत खुप आनंदी दिसत आहे. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ' नो कॅप्शन, खूप दिवसांनी.'

आता त्याचा हा शेवटचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी त्यांच्या या पोस्टवर आता त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना चाहते करत आहे.

Nitesh Pandey Last Post
Sirf Ek Bandaa Kaafi Hai: ट्विटरवर 'बंदा'चा डंका! नेटकऱ्यांनी घेतलं डोक्यावर..

नितेशच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ते म्हणजे शाहरुख खान स्टारर 'ओम शांती ओम', 'खोसला का घोसला', 'दबंग 2', 'बधाई दो', 'रंगून', 'हंटर', 'मेरे यार की शादी है', ' 'मदारी' सारख्या अनेक चित्रपटातही दिसले होते.

'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' आणि 'अनुपमा' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आणि लोकप्रियता मिळवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com