'इश्कबाज' फेम अभिनेत्री नीती टेलरने केलं गुपचुप लग्न

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 6 October 2020

'इश्कबाज' फेम टीव्ही अभिनेत्री नीती टेलर लग्न बंधनात अ़डकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरडपुडा केला होता. लग्नाआधी नीतीने ब्रायडल शावर आणि बॅचलर पार्टीचं आयोजन केलं होतं.

मुंबई- 'इश्कबाज' फेम टीव्ही अभिनेत्री नीती टेलर लग्न बंधनात अ़डकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरडपुडा केला होता. लग्नाआधी नीतीने ब्रायडल शावर आणि बॅचलर पार्टीचं आयोजन केलं होतं. आता नीतीने १३ ऑगस्ट रोजी परिक्षित बावासोबत एका कौटुंबिक सोहळ्यात लग्न केल्याचं समोर येतंय. परिक्षित आर्मी ऑफिसर आहे. नीतीने तिच्या लग्नाचा पहिला फोटो शोशल मिडियावर शेअर केला आहे. तसंच लग्नाचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर चाहत्यांसाठी शेअर केलाय. नीतीने एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना सांगितलं होतं की त्यांनी गुरगावमधील एका गुरुद्वारामध्ये लग्न केलं. लग्नाचा व्हिडिओ शेअर करत नीतीने लिहिलंय, मिस पासून मिसेस पर्यंतचा माझा प्रवास पूर्ण झाला. माझ्या सगळ्या हितचिंतकांना मी सांगू इच्छिते की मी परिक्षितसोबत १३ ऑगस्टला लग्न केलं. एका लहान, शांत आणि वैयक्तिक सोहळ्यात आमचं कोविड लग्न झालं ज्यामध्ये आमचे आई-वडिल सहभागी होते. नीतीचे लग्नातील सुंदर फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.   

हे ही वाचा: अक्षय कुमार मुंबईत या दिवशी करणार आगामी सिनेमाचं शूटींग   

niti taylor got married to her fiance parikshit bawa on august 13 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: niti taylor got married to her fiance parikshit bawa on august 13