Nitin Desai Death :'...सर्व गुजरात तुमचा'; मुंबईतल्या पहिल्या सभेनंतर नरेंद्र मोदींनी नितीन देसाईंना दिली होती मोठी ऑफर

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
nitin desai narendra modi
nitin desai narendra modiesakal

Mumbai News - प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला असून मराठीसह हिंदी सिनेसृष्टी हादरली आहे. देसाई यांनी कर्जतमधील आपल्या स्टु़डिओत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

स्टुडियोतील कर्मचाऱ्यांना त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत स्टुडिओत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच फोरेन्सिकची टीमही घटनास्थळी पोहोचल्याचं कळतंय.

nitin desai narendra modi
Nitin Desai Death: मराठी माणसाने पाहिलेलं सर्वात मोठं स्वप्न ND स्टुडिओ, नितीन देसाई यांनी राखेतून उभारलेलं साम्राज्य!

नितीन देसाई यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी आणि त्यांचा एक किस्सा सांगितला होता. नितीन देसाई यांनी 2003 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी कमळाचा स्टेज तयार केला होता. हा स्टेज 80 फूट लांब होता. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील लॉन्चिंग या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले होते.

विनोद तावडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मोठ्या कमळातून नरेंद्र मोदी बाहेर येतील आणि प्रेक्षकांना संबोधित करतील असं कार्यक्रमाचं नियोजन होतो. यावेळी जवळपास अडीच लाख प्रेक्षक जमा झाले होते.

मोदी यांनी प्रेक्षकांना संबोधित करताना म्हटलं होतं की, यातील एक लाख लोक मला ऐकण्यासाठी आले आहेत, बाकीचे दीड लाख लोक माझे मित्र नितिन देसाई यांनी तयार केलेला स्टेज पाहण्यासाठी आले आहेत.

nitin desai narendra modi
Nitin Desai Death : नितीन देसाईंचं ठाकरे कनेक्शन; अवघ्या २० तासात अविस्मरणीय बनवला 'तो' खास क्षण

देसाई सांगतात की, कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदी आणि त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर दोन दिवसांनी नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला. 'नरेंद्र मोदी का नितीन देसाई को प्रणाम. तुम्ही जे माझ्यासाठी केला आहात, याबाबत मी दोन दिवस विचार करत आहे. तुमच्याशी भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला भेटायला वेळ आहे का?'

नरेंद्र मोदी आणि देसाई यांची पार्ले येथे भेट झाली. जवळपास दोघांमध्ये 45 मिनिटे चर्चा झाली. नरेंद्र मोदी एक कलासक्त माणूस आहेत, असं देसाई सांगतात. 'मोदी आणि मी एका गाडीमध्ये बसून बाहेर पडलो.

यावेळी मोदींनी विचारलं की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे. यावेळी देसाई यांनी मोदींना एक चार मिनिटांचं प्रझेन्टेशन दिलं. प्रझेन्टेशन पाहून नरेंद्र मोदी भारावून गेले. ते म्हणाले महाराष्ट्र जिथे संपतो आणि राजस्थान जिथे सुरु होतो त्याच्या मधला सर्व गुजरात तुमचा आहे.

मी तुम्हाला दिडशे नाही तर 500 एकर जमीन देतो, तुम्हाला जो स्टुडिओ बनवायचा आहे तो गुजरातमध्ये बनवा'. यावेळी नितिन देसाई यांनी तीन अडचणी सांगितल्या. सर्व फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्रात आहे. तसेच गुजरात येथे सपाट जागा आहे.

महाराष्ट्रात नैसर्गिक विविधता आहे. तसेच गुजरातमध्ये मद्य बंदी आहे, पण जेव्हा पर्यटक येतील त्यांना मद्य लागेल. अशी अडचण देसाई यांनी बोलून दाखवली, त्यामुळे गुजरात येथे स्टिडिओ बनवण्याची ऑफर त्यांना नाकारावी लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com