Nivedita Saraf: मालाडला शॉपिंगला गेलेल्या निवेदिता सराफ यांच्यासोबत घडला धक्कादायक प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nivedita saraf got bad treatment while she shopping at malad infinity mall max shop

Nivedita Saraf: मालाडला शॉपिंगला गेलेल्या निवेदिता सराफ यांच्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

Nivedita Saraf News: अभिनेत्री निवेदिता सराफ मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेल्या अभिनेत्री. निवेदिता यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीज मधून अभिनय केलाय. निवेदिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

निवेदिता अनेकदा त्यांच्या कौटुंबिक, व्यावसायिक अनुभव शेअर करत असतात. इतकंच नव्हे, तर फोटो - व्हिडिओच्या माध्यमातून त्या नव्या - जुन्या आठवणी उलगडत असतात. नुकताच निवेदिता यांना मालाडला शॉपिंग करताना धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे.

(nivedita saraf got bad treatment while she shopping at malad max shop)

निवेदिता लिहितात.. नमस्कार मी इन्फिनिटी 2 मालाडमधील MAX दुकानात होते. मला खूप वाईट अनुभव आला. तिथे असलेला कर्मचारी त्यांना तुम्ही काहीही वस्तू विकत घ्या त्याची काही पर्वा केली नसते.

साधी मदत करायला कोणीही तयार नव्हते. एक मुलगी बाहेर आली आणि तिने फक्त दुसर्‍या सेल्समनला सांगितले की तिच्याकडे वेळ नाही.

निवेदिता पुढे लिहितात.."जेव्हा एका व्यक्तीने मला ओळखले तेव्हा माफी मागायला सुरुवात केली आणि मॅनेजरला फोन केला. मला चांगली ट्रीटमेंट नको होती कारण मी एक ओळखीचा चेहरा आहे.

मला चांगली ट्रीटमेंट हवी आहे कारण एक सामान्य ग्राहक म्हणून माझा तो हक्क आहे. आणि त्या दुकानात पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देखील समोरच्याकडून चांगली वागणून घेण्याचा हक्क आहे." अशी पोस्ट निवेदिता सराफ यांनी लिहिलीय.

 मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ. गेली काही वर्ष सातत्याने त्या विविध मालिकांमधून आपल्या भेटीला येत आहेत.

सध्या त्या कलर्स मराठी वरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेवर चाहते फिदा आहेतच. पण सध्या त्यांच्या नाटकाचीही जोरदार चर्चा आहे.

याशिवाय त्यांच्या 'मी स्वरा आणि ते दोघं' या नाटकाची सध्या बरीच चर्चा आहे. या नाटकात निवेदिता सराफ प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या नाटकाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.