Athiya Rahul wedding gift: आहेर आलाच नाही! 50 कोटीचं घर, BMW सगळं खोटं, शेट्टी अन्नाचा खुलासा

सुनिल शेट्टीच्या लेकीच्या लग्नात कोट्यावधींचा आहेर आल्याची बातमी निघाली साफ खोटी..
No expensive gifts, no 50 cr home, no bmw for Athiya Shetty and KL Rahul”, clarifies the family
No expensive gifts, no 50 cr home, no bmw for Athiya Shetty and KL Rahul”, clarifies the familysakal

KL Rahul Athiya Shetty wedding exloensive gifts totally false : सुपरस्टार सुनिल शेट्टीची लेक बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल यांचा शुभविवाह दोन दिवसांपूर्वी अत्यंत दिमाखात पार पडला.

सुनिल शेट्टीच्या लोणावळा येथील फार्म हाऊसवर हा शाही विवाह सोहळा रंगला. या सोहळ्यानंतर चर्चा झाली ती त्या दाम्पत्याला मिळलेल्या आहेराची. या आहेरात कोट्यावधी रुपयांची ,महागडी गिफ्ट्स आल्याची चर्चा वाऱ्या सारखी पसरली. पण अखेर या सगळ्या अफवा असल्याचे समोर आले आहे.
(No expensive gifts, no 50 cr home, no bmw for Athiya Shetty and KL Rahul”, clarifies the family)

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

No expensive gifts, no 50 cr home, no bmw for Athiya Shetty and KL Rahul”, clarifies the family
Bobby Deol Birthday: बॉबी अन् नीलम च्या लव्हस्टोरीत बाप धर्मेंद्र ठरला विलन.. असा झाला गेम..

या लग्नात अथिया आणि राहुल यांना अत्यंत महागडया वस्तु मिळाल्याची चर्चा झाली. अगदी याचा आकडा १०० कोटी इतका गेला असल्याचेही बोलले गेले.

अथियाचे वडील सुनिल शेट्टी यांनी, म्हणजेच बापाने लेकीला मुंबई मध्ये 50 कोटींचं घर भेट दिलं, अभिनेता सलमान खानने 1 कोटी 64 लाखांची ऑडी कार तर विराट कोहलीने 2.17 कोटींची BMW कार भेट दिल्याचे सांगितले गेले.

याशिवाय धोनीने 80 लाखांची निंजा बाईक, कुणी 30 लाखाचं घडयाळ तर कोणी कोट्यांचे दागिने दिल्याची यादी समोर आली होती.

अखेर हे सगळं खोटं असून या निव्वळ अफवा असल्याचं स्वतः आता राहुल आणि अथिया यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. 'मी माझ्या लेकीला 50 कोटींचे घर दिलेले नाही किंवा कोणीही कोटी रुपयांच्या गाड्या दिलेल्या नाहीत. या सर्व अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत,' असे स्वतः सुनिल शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com