
Sidharth Kiara Wedding: विकी-कतरिनाप्रमाणे कियारा-सिडनेही लग्नाआधी घेतला 'हा' मोठा निर्णय
बॉलिवूड स्टार्स कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकणार आहेत. 6 किंवा 7 फेब्रुवारीला ते लग्न करणार आहेत. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली असून पाहुणेही जैसलमेरला पोहोचू लागले आहेत. आता कतरिना कैफ आणि विकी कौशल प्रमाणे, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही नो फोन पॉलिसी फॉलो केली आहे.
वृत्तानुसार, लेटेस्ट अपडेटमध्ये, जोडप्याने हॉटेलमधील सर्व पाहुणे आणि कर्मचाऱ्यांना लग्नाचे कोणतेही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट न करण्याची विनंती केली आहे. त्यांनी आयोजकांना काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.
विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या वेळीही त्यांनी तशीच विनंती केली आहे. याआधी, अहवालात दावा करण्यात आला होता की बहुप्रतिक्षित लग्नाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की “सिद्धार्थ आणि कियारा निर्माते आणि दिग्दर्शकांसह त्यांच्या काही जवळच्या मित्रांना आमंत्रित करतील. करण जोहर आणि अश्विनी यार्दी अशी आजपर्यंत ज्या नावांची पुष्टी झाली आहे, ते दोघेही या जोडप्याच्या खूप जवळचे आहेत.
अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी संगीत, मेहेंदी आणि हळदी समारंभांसह प्री-वेडिंग फेस्टिवल होणार आहेत आणि 6 किंवा 7 फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथे ते लग्न करतील. त्यांच्या लग्नानंतर, सिद्धार्थ आणि कियारा दोन रिसेप्शन आयोजित करण्याची योजना आखत आहेत, एक चित्रपट उद्योगातील मित्रांसाठी मुंबईत आणि दुसरा सिद्धार्थच्या कुटुंबासाठी दिल्लीत.