FIFA World Cup 2022 : जेनिफर लोपेज, शकिराच्या यादीत नोरा फतेही; दाखवणार डान्सचा जलवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nora Fatehi Latest News

FIFA World Cup : जेनिफर लोपेज, शकिराच्या यादीत नोरा फतेही; दाखवणार डान्सचा जलवा

Nora Fatehi Latest News नोरा फतेही हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे जबरदस्त डान्स आणि बेभान करणाऱ्या अदा. बॉलिवूडमध्ये सध्या नोरा चांगलीच चर्चेत आहे. डान्ससोबतच घायाळ करणाऱ्या अदाकारीने तिने सगळ्यांची मन जिंकली आहेत. डान्स नंबरच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये नोराच नाव आघाडीवर आहे. नोराची लोकप्रियता केवळ भारत आणि बॉलिवूडपूर्ती मर्यादित राहिलेली नाही तर आता सातासमुद्रापार लोकप्रियता पोहोचली आहे.

जगभरातील फुटबॉल प्रेमींना घायाळ करण्यासाठी नोरा आता सज्ज झाली आहे. याचं कारण आहे ते म्हणजे फिफा विश्व कप २०२२. नोरा फतेही फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. फिफाच्या मंचावर नोराचे ठुमके पाहायला मिळतील. भारतातील चाहत्यांना तर नोराने भुरळ घातली आहेच. मात्र, आता ती जगभरात डान्सचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

दरवर्षी फिफा वर्ल्ड कपच्या ओपनिंग इव्हेंटला एखाद्या बड्या सेलिब्रिटीचा डान्स परफॉर्मन्स आयोजित केला जातो. यावर्षी २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या फिफामध्ये नोराच्या डान्सचा जलवा पाहायला मिळणार आहे. यापूर्वी जेनिफर लोपेज आणि शकिराने या इव्हेंटसाठी परफॉर्म केले आहे.

शकिराने फिफामध्ये गायलेलं तिचं वक्का वक्का हे गाणं आणि डान्स आजही लोक विसरलेले नाही. फिफाच्या या जागतिक मंचावर भारताचे आणि खास करून दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणारी नोरा ही एकमेव अभिनेत्री ठरली असल्याचे म्हटले जातंय. त्यामुळे नोराच्या करिअरसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे.

नोरा फिफा वर्ल्डकपमध्ये परफॉर्म करणार ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. ही बातमी कळताच नोराच्या चाहत्यांमध्ये आनंद संचारला आहे. नोराचा अभिमान वाटत असल्याचे अनेकजण म्हणत आहेत.

टॅग्स :nora fatehi