Sexy In My Dress! एवढी बोल्ड नोरा यापूर्वी कधी पाहिली नसेल

नोरानं तिच्या इंस्टावरुन नव्या गाण्याची घोषणा केली आहे. त्या गाण्याचे नाव ‘Sexy In My Dress' असे असून चाहत्यांनी नोराचे कौतूक केले आहे.
Nora Fatehi Sexy In My Dress New song teaser viral
Nora Fatehi Sexy In My Dress New song teaser viral esakal
Updated on

World Music Day 2023 : - नोराचं जेवढं कौतूक करावं तेवढं कमीच आहे. तुम्ही म्हणाल कौतूक कशासाठी, त्याचे कारण नोरानं तिच्या पाठीशी कुणी गॉडफादर नसताना स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयटम साँग करणारी नोरा ही आता देशातील आघाडीची सेलिब्रेटी झाली आहे.

सोशल मीडियावर नोराचा चाहतावर्ग मोठा आहे. तिचा इंस्टावर फॉलोअर्सही प्रचंड आहे. नोरानं इंस्टावर एखादा फोटो टाकण्याचा अवकाश त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. तिच्या चाहत्यांना फोटोंचे खूप कौतूक असते. त्यामुळेच की काय त्याला मिळणाऱ्या कमेंट हा खास असतात. आता नोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला मिळालेला प्रतिसाद लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

नोरानं तिच्या इंस्टावरुन नव्या गाण्याची घोषणा केली आहे. त्या गाण्याचे नाव ‘Sexy In My Dress' असे असून चाहत्यांनी नोराचे कौतूक केले आहे. त्या गाण्याचा टीझर आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांपासून नोरा ही सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे चर्चेत आली होती. तिची ईडीकडून चौकशीही करण्यात आली होती. नोरानं तिच्यावरील आरोपांचे खंडन केले होते.

आता वर्ल्ड म्युझिक डे २०२३ च्या निमित्तानं नोरानं शेयर केलेल्या त्या व्हिडिओवर आलेल्या कमेंटस भन्नाट आहे. त्यात नोराचा लूक लक्षवेधी आहे. नोराच्या नव्या गाण्याचे चाहत्यांना वेध लागले आहे. हे गाणं उद्या चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नोरा गेल्या काही वर्षांपासून टीव्ही मनोरंजन विश्वात सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. तिनं रियॅलिटी शोमध्ये तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Nora Fatehi Sexy In My Dress New song teaser viral
Adipurush Controversy : आदिपुरुषच्या टीमला जिवंत जाळा! शक्तिमानचा संताप

राजीव देव यांनी त्या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. नोराच्या गेल्या काही प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास आयफा २०२३ पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. तो सोहळा अबुधाबी येथे पार पडला होता. अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती थँक गॉड नावाच्या चित्रपटामध्ये देखील दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com