लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार नाही - माधुरी दीक्षित

वृत्तसंस्था
Friday, 29 March 2019

मुंबई : उर्मिला मातोंडकरच्या काँग्रस प्रवेशानंतर, माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यावर माधुरीने मी कोणत्याही पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने हा खुलासा केला आहे. या सगळ्या अफवा असल्याचे माधुरीने म्हटले आहे. 

माधुरी दीक्षित भाजपच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. अभिनेता संजय दत्तही उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. मात्र संजय दत्तने ट्विटरवरून निवडणूक लढविणार असल्याते स्पष्ट केली. तसेच सलमान बाबातही अशाच अफवा पसरल्या होत्या. त्याने देखिल ट्विटरवरुन याबाबत आपली भूमिका मांडत निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: not going to contest the Lok Sabha elections from Pune - madhuri dixit