आता सलमानच्या लग्नाबाबत ज्योतिषी म्हणतो की...

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 4 October 2020

बिग बॉस १४ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ३ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमिअर पाहायला मिळाला. तेव्हा शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे भविष्य सांगण्यासाठी एक ज्योतिष व्हिडीओ कॉलद्वारे तेथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई - फिल्म इंडस्ट्रीमधल्या इतर कुणाच्या नाही पण स्टार अभिनेता सलमान खान याच्या लग्नाची चर्चा तर नेहमीच होते. विशेष म्हणजे वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही सलमानच्या लग्नाचा टीआरपी काही कमी झालेला नाही. सध्या बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बिग बॉस या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.

दरवेळी सलमान त्याचे अफेअत आणि त्याच्या लग्नाच्या वर्षाबाबत चर्चा होतच असते. अर्थात सलमानला यात फार काही नाविन्य वाटत नसले तरी त्याच्या फॅन्सला यासगळ्यात कमालीचा रस आहे. बिग बॉस १४ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ३ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमिअर पाहायला मिळाला. तेव्हा शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे भविष्य सांगण्यासाठी एक ज्योतिष व्हिडीओ कॉलद्वारे तेथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान त्यांनी सलमानच्या लग्नाविषयी देखील भविष्यवाणी केली.

एजाज आणि निकीचे भविष्य ऐकल्यानंतर सलमानने हसत हसत जनार्दन यांना तुम्ही सहा वर्षांपूर्वी माझे लग्न होणार आहे असे सांगितले होते पण झालेच नाही. ते ऐकून प्रेक्षकांना हसू अनावर झाले. तसेच सलमानने पुढे असा काही उपाय आहे का ज्याने माझे लग्नच होणार नाही असे म्हटले. सलमानचे प्रश्न ऐकल्यावर जनार्दन यांनी, तुझे लग्न होणार होते पण काही कारणास्तव ते नाही झाले असे म्हटले. आता तुझ्या लग्नाचा योग नसल्याचे देखील म्हटले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणा-या बिग बॉस शो मध्ये  ‘बिग बॉस १४’मध्ये सर्वात पहिले अभिनेता एजाज खान आणि निकी तंबोलीची एण्ट्री झाली. त्यावेळी ज्योतिष जनार्दन यांना सलमानने एजाज आणि निकी यांचे भविष्य विचारले. त्यावर त्यांनी निकी एकदम साधी दिसत असली तरी अतिशय हुशार आहे आणि करिअरमध्ये खूप पुढे जाईल असे म्हटले. तर एजाजला सल्ला देत त्यांनी स्वत:च्या मनाचे ऐकण्याचे सांगितले आणि कोणीही भडकवल्यानंतर कोणतेही पाऊल उचलू नये असे त्यांनी म्हटले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now In Bigg Boss 14 Atrologist Talk About Salman Khan Wedding...