इरॉस नाऊ कंपनीने केली मोठी चूक, शेवटी मागितली माफी

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 22 October 2020

बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारी प्रॉडक्शन कंपनी म्हणून इरॉस इंटरनॅशनला बोलबाला आहे. सोशल माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिएटीव्ह जाहिरात करुन लोकांचे लक्ष वेधून घेण्यातही इरॉसचे वेगळेपण आहे.

मुंबई - केवळ भारतातच नव्हे तर पुर्ण जगभरात प्रसिध्द असणा-याने इरॉस नाऊ कंपनीने नको ती एक पोस्ट नवरात्रीच्या निमित्ताने व्हायरल केली. आणि त्यावरुन गदारोळ सुरु झाला. अनेकांनी  इरॉस नाऊ इंटरनॅशनला धारेवर धरले आहे. कित्येकांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे. त्यांनी ऐन नवरात्रीच्या दिवसांत केलेली ती पोस्ट त्यांना त्रासदायक ठरणार आहे.

बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारी प्रॉडक्शन कंपनी म्हणून इरॉस इंटरनॅशनला बोलबाला आहे. सोशल माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिएटीव्ह जाहिरात करुन लोकांचे लक्ष वेधून घेण्यातही इरॉसचे वेगळेपण आहे. आता मात्र ते एका वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नवरात्रीच्या निमित्ताने केलेली ती वादग्रस्त पोस्ट. या पोस्टमध्ये कतरिना या अभिनेत्रीचा साडीतील एक फोटो शेयर केला आहे. एवढ्य़ावरच इरॉस थांबली असती तर बरे झाले असते. मात्र त्यांनी त्या फोटोवर केलेली कमेंट भलतीच तेढ आणि वाद तयार करणारी ठरत आहे.

 कतरिनाच्या त्या फोटोवर 'Do you want to put the 'ratris' in my navratris', ' Let have some majama in pajama' अशा प्रकारचे मेसेज टाकण्यात आले आहे. केवळ कतरिना नव्हे तर रणवीर कपूर, रणबीर  कपूर, सलमान खान या अभिनेत्यांची छायाचित्रे वापरण्यात आली असून त्यांच्या समोर अश्लाघ्य शब्दांतील मेसेज तयार करण्यात आले आहे. हे वाचल्यानंतर नेटक-यांनी इरॉसला धारेवर धरण्यास सुरुवात केली. तसेच बॉयकॉट इरॉस हा हॅशटॅग चालविण्यास सुरुवात केली आहे. प्रकरण आपल्यावर शेकते आहे असे लक्षात आल्यानंतर इरॉस इंटरनॅशनने तातडीने ती पोस्ट व्टिटवरुन काढून टाकली आहे. 

आता इरॉस इंटरनॅशनने यासगळ्या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्याकडून प्रसृत करण्यात आलेल्या संदेशामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर इरॉस इंटरनॅशनल माफी मागत असल्याचे म्हटले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now eross now aplogised for its post published on social media