आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवी मराठी वेब सिरीज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच नव्हे तर हिंदी भाषिक वेब सिरीजही मोठया प्रमाणात नेटीझन्सचे मनोरंजन करताना दिसत आहेत.

मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच नव्हे तर हिंदी भाषिक वेब सिरीजही मोठया प्रमाणात नेटीझन्सचे मनोरंजन करताना दिसत आहेत.

आता मराठीतही वेब सिरीजचा प्रयोग व्हायला सुरवात झाली आहे. पण 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' या मराठी वेब सिरीज ला किती प्रतिसाद मिळेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. ही वेब सिरीजची निर्मिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते तरुण चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके यांनी केली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्यांनी आजपर्यंत हाताळले असून त्यांच्या चित्रपटांमध्ये शाळा, आजोबा आणि फुंतरू यांचा समावेश आहे. यानिमित्ताने आमच्या प्रतिनिधीने सुजय त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "वेब सिरीज निर्मितीचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे. कॉलेज लाईफ मधील एकांकिका स्पर्धा, पडद्यासमोरील तसेच पडद्यामागील नाट्य, यांच्याबरोबरीनेच कॉलेज विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होणारी उलथापालथ असे या मालिकेचे साधारण कथानक असेल.

पुढे ते म्हणाले की, सेक्स,ड्रग्ज & थिएटर सहा कॉलेज विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारीत आहे. दहा भागांची ही मालिका असून यामध्ये काही नवीन तरुण कलाकार तर काही इंडस्ट्रीतील प्रसिध्द कलाकारांचा समावेश असेल. सेक्स, ड्रग्ज & थिएटर ही वेब सिरीज आजच्या तरुणाईची ही कथा आहे. मला वाटतं, एकांकिका आणि नाटक वापरुन कुणीही क्रांती घडवून आणू शकतं. वेब सिरीज च्या नावात जरी सेक्स आणि ड्रग्स हे शब्द असले तरी वेब सिरीज मध्ये नकारात्मकता अजिबात नाही. हे तुम्हाला वेब सिरीज बघूनच कळेल. यात फार्मसी कॉलेजचे वातावरण आणि विद्यार्थी दाखविण्यात असले आहेत. वेब सिरीज चे एकूण तीन सिजन्स असतील. सध्या पहिला सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सिरीज ही कल्पना माझी आहे. मात्र संवाद लिहिण्यात मला  इंडस्ट्रीतल्या एका मित्राची मदत झाली. मुळात माझा नाटकाशी केवळ ते बघण्याशिवाय काही संबंध नाही. पण या वेब सिरीज मध्ये नाटक हा मुद्दा केंद्रबिंदू असेल."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Navi Marathi web series Sex Drugs & Theater will be coming