Urvashi Rautela: आता रिषभ नव्हे तर विराटच्या प्रेमात पडली उर्वशी....दिवाळी निमित्तानं केली खास पोस्ट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela

Urvashi Rautela: आता रिषभ नव्हे तर विराटच्या प्रेमात पडली उर्वशी....दिवाळी निमित्तानं केली खास पोस्ट...

 सर्वत्र दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवुड स्टारही यामध्ये मागे नाही. सर्व स्टार्सने आपआपल्या घरच्या लक्ष्मी पुजनाचे फोटो शेअर केलेत.त्यात उर्वशी कुठे  मागे राहणार तिने ही तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले. मात्र आजच्या ग्रहणाप्रमाणे उर्वशीलाही ग्रहण लागल्याचं दिसतंय. तिने कोणतीही पोस्ट टाकली तरीही ती ट्रोल होणं हे फिक्सचं असल्याचं मागील काही दिवसांपासून दिसतयं.

गेल्या काही दिवसांपासून उर्वशी रौतला आणि ऋषभ पंत यांचं नाव टी-२० विश्वचषकात चर्चेचा विषय आहे. ऋषभ टी-२० विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात खेळला नव्हता तरी त्याची चर्चा झाली जोरात झाली. आता उर्वशीला ट्रोल करण्याच कारण म्हणजे तिने पोस्ट शेअर करत दिलेलं कॅप्शन. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये शायरी किंवा काही हार्ट ब्रोकची इमोजी नाही तर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यावेळी तिनं शुभेच्छा देताना ऋषभ नव्हे दुसऱ्याच एका क्रिकेटरच्या नावाचा कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे.

उर्वशीने दिवाळीच्या शुभेच्छा देताना कॅप्शन लिहिलंय, 'तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या विराट शुभेच्छा'. भारताने दिवाळीच्या एक दिवस आधी पाकिस्तानविरुद्ध भारत हा सामना  विराट कोहलीच्या दमदार खेळीने जिंकला. त्यामुळे विराटची भरपुर प्रशंसा केली. त्याच्यामुळेच भारतीयांची दिवाळी अधिक उत्सहात झाली. उर्वशीनेही तिचे काही फोटो शेअर करत सर्वांना 'विराट शुभेच्छा' देण्यानेही काहींना ऋषभची आठवण आली आहे. उर्वशीच्या नेहमीप्रमाणेच तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा भडिमार केला.

हेही वाचा: Urvashi rautela: उर्वशीच्या गळ्यात ऋषभ पंतची चेन? काही तरी झोल आहे रे बाबा!

उर्वशीच्या या फोटोवर एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘ऋषभ भाई आता तुला हो म्हणेल'. तर एका युजरने लिहिले आहे की, 'ऋषभ कुठे आहे?'. एकाने खुप शायराना अंदाजात लिहिलयं 'इस दीपावली में आप के इंतजार का हो अंत, हमारी शुभ कामनाएँ हैं की आप को मिले पंत' तर एकानं तु आर.पी.ला मिस करतेय का’ असा प्रश्न विचारलाय.