esakal | RRR teaser: ज्युनिअर एनटीआरच्या 'RRR' चा टिझर प्रदर्शित!
sakal

बोलून बातमी शोधा

 NTRs First Look Video from RRR Movie Introducing Bheem

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नेहमी वेगळ्या पध्दतीचे विषय हाताळले जातात. ते तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर मांडलेही जातात. आता सध्या आरआरआर नावाचा सिनेमाही सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. एस. एस. राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

RRR teaser: ज्युनिअर एनटीआरच्या 'RRR' चा टिझर प्रदर्शित!

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ज्युनिअर एनटीआर हा आरआरआर या चित्रपटात  काम करत आहे. हा चित्रपट नेमका काय आहे याच्याविषयी सर्वांना उत्सुकता होती. अखेर त्याचा टिझर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच त्याला लाखो हिटस मिळाले आहेत. ज्युनिअर एनटीआरने यात कोमराम भीम नावाची मुख्य़ भूमिका केली आहे. त्याचा टिझर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यामुळे मुख्य चित्रपटाचा ट्रेलर नेमका कसा असणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नेहमी वेगळ्या पध्दतीचे विषय हाताळले जातात. ते तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर मांडलेही जातात. आता सध्या आरआरआर नावाचा सिनेमाही सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. एस. एस. राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी भव्य दिव्य अशा बाहुबली या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर त्यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. त्यांचा आरआरआर हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्यात दाखविण्यात आलेला काळ 1920 च्या दरम्यानचा असून ज्युनिअर एनटीआरने एका धार्मिक मुस्लिम व्यक्तीची भूमिका साकारली आहे. 

वास्तविक त्यात त्याने कोमराम भीम ही भूमिकाही केली आहे. मात्र त्य़ाचे पुन्हा एका नव्या भूमिकेत जाणे हे सर्वांसाठी कोडे आहे. ते अर्थातच चित्रपट पाहिल्य़ानंतर सुटणार आहे. राजामौलीच्या नव्या ट्रेलरमधून मात्र उत्सुकता ताणली गेली आहे. भव्य सेट, लक्षवेधी ग्राफिक, अफलातून छायाचित्रण आणि ज्युनिअर नटराजनचा जबरदस्त अनुभव यामुळे ट्रेलर प्रचंड लोकप्रिय होतो आहे. या अगोदर रामचरण करत असलेल्या अलुरी सिथाराम राजू याचाही ट्रेलर प्रसिध्द करण्यात आला होता. आता कोमराम भीम या भूमिकेतील ज्युनिअर नटराजनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ज्युनिअर नटराजनचे चाहत्यांनी त्याच्या या नव्या भूमिकेचे कौतूक केलं आहे.

या चित्रपटात आणखी अजय देवगण, अलिया भट, श्रिया सरन यांच्याही भूमिका आहेत. नव्याने प्रदर्शित करण्यात आलेल्या टिझरवर राजामौलीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. 300 कोटीपेक्षा जास्त बजेट असलेला हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील दोन भटक्या समाजातील नेत्यांची लढाई या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आली आहे.

loading image