esakal | 'ओ शेठ, चोरलं व्हयं आमचं गाणं! गायकावर चोरीचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

'ओ शेठ, चोरलं व्हयं आमचं गाणं! गायकावर  चोरीचा आरोप

'ओ शेठ, चोरलं व्हयं आमचं गाणं! गायकावर चोरीचा आरोप

sakal_logo
By
युगंधर ताजणे

सोशल मीडियावर 'ओ शेठ.. तुम्ही नादच केलाय थेट' हे गाणं प्रचंड गाजलं. अनेकांनी या गाण्यावर रिक्रिएशन करत डान्सचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. उमेश गवळी यांनी हे गाणं गायलं आहे. मात्र आता हेच गाणं चोरीला केल्याचा आरोप निर्मात्यांनी केला आहे. प्रणिकेत खुणे आणि संध्या केशे यांनी उमेश गवळीवर गाण्याच्या चोरीचा आरोप केला आहे. "या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आम्ही आहोत आणि आमच्याच युट्यूब चॅनेलवर गायक उमेश गवळी यांनी कॉपीराइटचा दावा केला आहे. युट्यूबकडून आम्हाला स्ट्राइक आल्याने आमचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे", असं प्रणिकेत म्हणाले.

त्यामुळे या गाण्यावरुन सध्या वाद पेटल्याचे दिसून आलं आहे. सोशल म़ीडियावर देखील त्या तक्रारदारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुळ गाणं आमचं आहे मात्र ते चोरुन त्यावर गाण्याची निर्मिती करण्यात आली. यापूर्वी देखील संबंधितांना आम्ही त्यांनी केलेल्या कृत्याची आठवण करुन दिली होती. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याचेही सांगण्यात आले आहे. काही दिवसांपासून ज्या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला त्या गाण्याची क्रेझ अजूनही तरुणाईच्या मनावर आहे. जेव्हा ते गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं तेव्हा त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

यासगळ्या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना ज्यांनी ते गाणं गायलं त्या उमेश गवळी यांनी सांगितलं की, या गाण्याचं कुणीही एक मालक नाही. आम्ही तिघेही मालक होतो. मी जेव्हा हे गाणं गाणार तेव्हा त्या दोघांनी माझ्याशी संपर्क केला. वास्तविक मी आधीपासून गाणी गातो. मला या गाण्यासाठी कुठलंही मानधन मिळालं नाही. ऑडिओ त्यांच्या चॅनलला आणि व्हिडीओ माझ्या चॅनलला असं आमचं ठरलं होतं. आता त्यावरुन का वाद निर्माण केला जातोय. हे मला कळत नाही. मी त्यांना गाणं पाठवल्याचे पुरावे असल्याचेही उमेश यांनी यावेळी सांगितलं.

loading image
go to top