राजला केलेली अटक बेकायदेशीर, अभिनेत्री गहना संतप्त

ओटीटी प्लॅटफॉर्मवर (ott platform) आपल्या हॉट अंदाजामुळे (hotness) चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे गहना वसिष्ठ
actress gehana vasitha
actress gehana vasitha Team esakal
Updated on

मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्मवर (ott platform) आपल्या हॉट अंदाजामुळे (hotness) चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे गहना वसिष्ठ(ghehna vasistha). सध्या ती राज कुंद्राच्या (raj kundra) प्रकरणामुळेही सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि प्रसिध्द उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणं आणि ते आपल्या अॅपवरुन शेयर करणं याप्रकरणी अटक केली होती. आता याप्रकरणावर अभिनेत्री गहनानं वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मीडियावर आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गहनानं राजला झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे.

गहनानं राज कुंद्राच्या अटकेबाबत एक व्टिट केलं आहे. त्याविषयी तिनं म्हटलं आहे की, अर्थातच राजला करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर आहे. अशी प्रतिक्रिया देऊन तिनं धक्कादायक खुलासा केला आहे. तिचं म्हणणं आहे की जेव्हा सरकारी वकिल सांगतात की, राजनं जेव्हा पुरावे डिलिट केले म्हणून त्याला अटक करण्यात आली. मात्र एक गोष्ट यापूर्वी पोलिसच सांगत होते की, आम्ही त्याच्या मोबाईल, लॅपटॉपमधून ही सगळा डेटा रिकव्हर केला होता. असे असताना त्यांनी कोणत्या कारणास्तव राजला अटक केली याविषयी माहिती पुढे यायला हवी. असं गहनानं म्हटलं आहे.

actress gehana vasitha
राहुल स्टंट करायला गेला, जखमी झाला: फोटो व्हायरल
actress gehana vasitha
प्रख्यात चित्रपट समीक्षक राशिद इराणी यांचं निधन

मुंबई पोलिसांनी आतापर्यत राजकडे जो तपास केला आहे त्यातून त्यांनी त्याच्या मोबाईल, लॅपटॉप, बॅक डिटेल्स यातून बरीचशी माहिती गोळा केली आहे. यापूर्वी त्याबाबतची माहिती प्रसिद्ध झाली आहे. सध्या राज हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानं दोनवेळा न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयानं तो फेटाळून लावला. त्यानंतर आता त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासातून पुन्हा नवीन कोणत्या गोष्टी समोर येतात याची उत्सुकता होती. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी राज आणि शिल्पाचे बॅक अकाउंट सील केले आहेत. त्यातूनही धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.

गहनानं केलेल्या व्टिटनंतर राजच्या अटकेबाबच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांना आता आणखी कोणत्याप्रकारचे पुरावे हवे आहेत. त्यानं त्याच्याकडे जी काही माहिती होती ती पोलिसांना दिली आहे. याशिवाय आणखी कुठली कागदपत्रं त्यानं आपल्या शरीरात लपवून ठेवलेली नाहीत. म्हणून तपास करणाऱ्यांनी मेंदूचा वापर करावा. अशी प्रतिक्रिया गहनानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com