OMG 2 Yami Gautam: आता थेट देवाला खेचणार कोर्टात, ओह माय गॉड 2 मधील यामीचा फर्स्ट लुक व्हायरल

OMG 2 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
omg 2 movie update yami gautam share her look akshay kumar pankaj tripathi
omg 2 movie update yami gautam share her look akshay kumar pankaj tripathi SAKAL

OMG 2 Movie Yami Gautam News: सध्या अक्षय कुमारच्या ओह माय गॉड 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा 2012 ला आलेल्या ओह माय गॉड सिनेमाने जाणकार आणि समीक्षकांची मनं जिंकली.

आता अक्षय कुमार पुन्हा एकदा ओह माय गॉड 2 सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

पहिल्या भागाप्रमाणे दुसर्या भागातही कोर्टरुम ड्रामा रंगणार असं दिसतंय. ओह माय गॉड 2 सिनेमातील यामी गौतमचा फर्स्ट लुक समोर आलाय.

(omg 2 movie update yami gautam share her look akshay kumar pankaj tripathi)

omg 2 movie update yami gautam share her look akshay kumar pankaj tripathi
Rupali Bhosle: तुमचा आशीर्वाद घेऊन नवीन प्रवास सुरु करते... रुपाली भोसलेच्या पोस्टने चर्चांना उधाण

यामी गौतमच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती एका वकिलाच्या लूकमध्ये दिसत आहे. तिने काळा कोट आणि पांढरा शर्ट घातला आहे. यामीच्या चेहऱ्यावर तीव्र भाव आहेत.

तिच्या पात्राचे नाव कामिनी माहेश्वरी आहे. चित्रपटातील तिचा लूक शेअर करताना यामीने लिहिले - कामिनी माहेश्वरीला भेटा. OMG 2 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

यामीचा हा लुक अक्षय कुमारनेही लूक शेअर केला आहे. अक्षयने लिहिलंय की - सत्य ते आहे जे सिद्ध केले जाऊ शकते. खरी लढाई सुरू होणार आहे. याचा टीझर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

याआधी सिनेमातील अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा लुक शेयर करण्यात आला होता. अक्षय सिनेमात भगवान शंकराच्या भुमिकेत दिसतोय, तर पंकज त्रिपाठी सामान्य माणसाच्या भुमिकेत दिसत आहे.

दुसरीकडे अक्षय कुमार बद्दल बोलायचं झाले तर गेले काही दिवस त्याच्यासाठी काही खास चांगले ठरलेले नाहीत. त्याने एकामागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. गेल्या एका वर्षात अक्षयने थिएटरमध्ये 5 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी त्यानंतर बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, कठपुतली, राम सेतू आणि त्यानंतर इम्रार हाश्मीसोबतचा सेल्फी हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकले नाहीत.

त्यामुळे आता OMG2 हा चित्रपट अक्षयच्या फ्लॉप चित्रपटांवर फुलस्टॉप लावेल का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com