Oppenheimer Movie : ओपनहायमरनं एक गोष्ट नेहरुंना सांगितली होती, ज्यामुळे अजूनही...!

ओपनहायमरनं जेव्हा अणुबॉम्बची पहिल्यांदा चाचणी केली आणि ती यशस्वी झाल्यानंतर त्यानं गीतेमधील एका श्लोकाचा दाखला दिला होता.
Oppenheimer, the Bhagavad Gita and a secret message to Nehru
Oppenheimer, the Bhagavad Gita and a secret message to Nehruesakal

Oppenheimer, the Bhagavad Gita and a secret message to Nehru : सिद्ध हॉलीवूडपटांचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा ओपनहायमर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भारतातूनही नोलनचे असंख्य चाहते आहेत. चित्रपटामध्ये ओपनहायमरच्या हाती असलेल्या भगवद्गगीतेमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. यासगळ्यात ओपनहायमर आणि भारताचे कनेक्शन काय होते याविषयी माहिती पुढे येत आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु आणि ओपनहायमर यांचे संबंध आणि त्यांच्यातील संवादाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. ओपनहायमर हा अणुबॉम्बचा जनक म्हणून ओळखला जातो. त्यानं अणुबॉम्बची निर्मिती केल्यानंतर त्याच्याविषयी वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. चित्रपटामधून ओपनहायमर आणि भगवद्गगीतेचा संदर्भ पुढे आल्यानंतर अनेकांनी वेगवेगळे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

ओपनहायमरनं जेव्हा अणुबॉम्बची पहिल्यांदा चाचणी केली आणि ती यशस्वी झाल्यानंतर त्यानं गीतेमधील एका श्लोकाचा दाखला दिला होता. एका व्हायरल झालेल्या मुलाखतीमध्ये त्यानं म्हटलं होतं की, आता मी काळ झालो आहे. मी मृत्यू आहे. या जगाचा संहार होणार आहे. अशा शब्दांत त्यानं ती प्रतिक्रिया दिली होती. चित्रपटामध्ये देखील त्याचा स्पष्टपणे उल्लेख आला आहे. यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

नेहरु आणि ओपनहायमर यांची भेट झाली होती. त्यांच्यात संवादही झाला होता. असा उल्लेख होमी भाभा यांचे जीवनचरित्र लिहिणाऱ्या भक्तिअर के दादाभॉय यांनी केला आहे. नेहरुंनी ओपनहायमर सारख्या वादग्रस्त शास्त्रज्ञाला भारतात चर्चेसाठी येण्याचं आणि भारतात आश्रय देण्याचे कबूल केले होते. होमी भाभा यांनी भारतात अणुभट्टी आणि त्याच्याशी संबंधित संस्था उभारण्यासाठी भरीव योगदान दिले होते.

Oppenheimer, the Bhagavad Gita and a secret message to Nehru
Malaika Arora : लग्नाची तारीख जवळ आलीय!

नेहरुंनी ओपनहायमरला भारतात येण्याचे निमंत्रण तर दिले होते. पण त्यानं ते नाकारले. असा उल्लेख भाभा यांच्या पुस्तकात आहे. ओपनहायमला त्याच्या देशानं दिलेली ताकीद यामुळे त्यानं पुढे अन्य कोणत्याही देशात जाण्यास त्याला कशाप्रकारे मज्जाव करण्यात आला हे सांगितले होते.

Oppenheimer, the Bhagavad Gita and a secret message to Nehru
Janhvi-Varun Dhawan : 'बवाल' हो गया ना!

पंडित नेहरु यांच्या भगिनी आणि त्यावेळी अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणून काम पाहणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित यांच्या संग्रहातील पंडित नेहरु आणि ओपनहायमर यांच्याशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजयालक्ष्मी पंडित यांना १० फेब्रुवारी १९५० रोजी एक फोन आला होता तो ओपनहायमर यांनी केला होता. त्याबाबत विजयालक्ष्मी यांनी पंडितजींना पत्र लिहून कळवले होते.

ओपनहायरमनं पंडित नेहरुंना त्या गोष्टीविषयी सांगितलं होतं. ती गोष्ट म्हणजे अमेरिकेतील अणूप्रयोग आणि अणूबॉम्बची निर्मिती. अमेरिका वेगानं अणूबॉम्ब तयार करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी आम्हाला थोरियम हवे आहे. त्यासाठी आम्ही तुमच्याशी संपर्क साधतो आहोत. याशिवाय ब्रिटननं देखील तुम्हाला याबाबत विचारणा करेल. असे ओपनहायमर यांनी म्हटले होते.

Oppenheimer, the Bhagavad Gita and a secret message to Nehru
Shah Rukh Khan : 'चक दे इंडिया'! किंग खानच्या हातात ट्रॉफी, यावर्षी भारत वर्ल्ड कप जिंकणारच!

यानंतर नेहरु यांनी विजयालक्ष्मी यांच्याकडून आलेल्या पत्राला उत्तर दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, भारताची अणुबॉम्बची निर्मिती यासंदर्भातली भूमिका वेगळी आहे. त्यामुळे भारत सरकार थोरियमच्याबाबत कोणताही निर्णय घेणार नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे निर्णयात्मक पाऊल थोरियम बाबत घेणार नसल्याचे त्यावेळी नेहरुंनी स्पष्ट केले होते.

Oppenheimer, the Bhagavad Gita and a secret message to Nehru
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com