हॅरी-मेगनची घेतली मुलाखत; ओप्राची झाली 'कोट्यवधींची' कमाई

Orpah winfrey got attest 51 crore rupees prince harry and Meghan Markle interview
Orpah winfrey got attest 51 crore rupees prince harry and Meghan Markle interview
Updated on

मुंबई - ज्या मुलाखतीनं सा-या जगाला वेगळ्या कोड्यात पाडलं त्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सोशल मीडियावर त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे बोललं जात आहे. ब्रिटीश राजपुत्र हॅरी आणि राणी मेगन यांची मुलाखत एका वेगळ्या कारणासाठी गाजली. एवढ्या मोठ्या रॉयल फॅमिलीमध्ये पण असे काही घड़ू शकते का असा प्रश्न लोकांना पडला होता. जिथं रॉयल फॅमिलीची ही गोष्ट तिथं सर्वसामान्यांनी काय बोलायचे असंही अनेकांना वाटून गेलं. जिनं ती मुलाखत घेतली होती. ती ओप्रा विन्फ्रे मुलाखत घेण्यासाठी जगप्रसिध्द आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. ज्यावेळी ओप्रा मुलाखत घेते त्यावेळी त्या मुलाखतीतून हाती काही वेगळं लागतं. असा प्रेक्षकांचा आजवरचा अनुभव आहे.

एका रिपोर्टनुसार ओप्रानं जी मुलाखत घेतली त्यासाठी तिनं रॉयल फॅमिलीकडून मोठी रक्कम घेतल्याची माहिती समोर आली आहे. तुम्हालाही ओप्रानं किती रक्कम घेतली ती ऐकल्यावर धक्का बसेल. अर्थात त्याची चर्चा आहे. त्याला अधिकृत काही स्टेटमेंट नसले तरी त्याविषयी बोलले जात आहे. ओप्राला त्या मुलाखतीसाठी तब्बल 51 कोटी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मार्कला त्या मुलाखतीसाठी कुठलेही पैसे देण्यात आलेले नाहीत.

टॉक शो ओप्रा विन्फ्रे हा तिचा प्रसिध्द शो आहे. त्यात तिनं आतापर्यत जगातील वेगवेगळ्या प्रसिध्द लोकांची मुलाखत घेतली आहे. ज्यावेळी रॉयल फॅमिलीतील हॅरी आणि मेगननं ओप्राला मुलाखत दिली तेव्हा त्या मुलाखतीनं सगळ्यांना हादरवून सोडलं होतं. त्यात शाही रॉयल परिवारावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्या मुलाखतीचे प्रसारण अमेरिकेतील सीबीसी या चॅनेलवरुन करण्यात आले होते. आता त्याची चर्चा ब्रिटन पासून अमेरिकेपर्यत जवळपास अनेक देशांमध्ये सुरु आहे.

दुसरीकडे यासगळ्यात ओप्राची चांगलीच कमाई झाली आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सीबीसीनं ही मुलाखत घेण्यासाठी ओप्राला कमीतकमी 51 कोटी रुपये दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार प्रसिध्द मुलाखतकार ओप्राला 51 ते 65 कोटी रुपये मिळाले आहेत. ते पैसे तिला ती मुलाखत प्रसारित करण्यासाठी देण्यात आले आहेत. वॉल स्ट्रीटनं त्या डीलची माहिती त्यांच्या सुत्रांकडून घेतल्याचे कळते आहे. 

 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com