Orry Viral News : एक दोन नव्हे तर तब्बल पाच जणांना डेट करतोय 'ओरी'? करणच्या शो मध्ये नको ते बोलून गेला!

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेचा नेहमीच उल्लेख केला जातो त्या कॉफी विथ (Koffee with kara show 8 season) करण मालिकेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.
Orry Karan Johar Show interview dating news
Orry Karan Johar Show interview dating newsesakal
Updated on

Orry Karan Johar Show interview dating news : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेचा नेहमीच उल्लेख केला जातो त्या कॉफी विथ (Koffee with kara show 8 season) करण मालिकेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. करणच्या या शो चा आठवा सीझनही आता निरोप (Karan Johar Latest News) घेताना दिसणार आहे. यावरुन त्या मालिकेची लोकप्रियता दिसून येईल.

करणचा तो शो ओरी, कुशा कपिला, तन्मय भट्ट आणि दानिश सैत यांच्या (Orry Latest News) उपस्थितीनं चर्चेत आला आहे. त्याचा व्हायरल झालेला टीझर हा प्रेक्षकांचे, चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यात करणनं ओरीला जे प्रश्न विचारले ते एवढे भन्नाट होते की ओरीनं (Orry News) दिलेल्या उत्तराची चर्चा होताना दिसत आहे. ओऱी हा सध्याच्या घडीला मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे.

करण आणि ओरीच्या त्या शो मध्ये करणनं त्याला विचारलेले ते प्रश्न (Orry Dating News) कार्यक्रमाची रंगत वाढवताना दिसणार आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या प्रोमोची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही (Latest Bollywood News) दिवसांपासून ओरी हा वेगवेगळ्या सेलिब्रेटींसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आला होता. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोबत ओरीचा झालेला वाद अजुन चर्चेत आहे.

त्या फिनाले एपिसोडचा व्हायरल झालेला प्रोमो हा करणच्या प्रश्नांनी लक्षवेधी झालेला दिसतो. करण ओरीला विचारतो की, ओरी तू सिंगल आहेस का, त्यावर ओरी म्हणतो की, मी पाच जणांना डेट करतो आहे. तू खरच पाच जणांना डेट करतो आहेस, त्यावर पुन्हा तो म्हणतो की, होय मी चिटर आहे. ओरी हा चीटर आहे. असे म्हणत ओरीच्या त्या व्हिडिओनं लक्ष वेधून घेतले आहे.

Orry Karan Johar Show interview dating news
Main Atal Hoon Twitter Review : सणसणीत, खणखणीत असा 'मैं अटल हू'! सर्वाधिक चर्चा कुणाची होतेय माहितीये?

ओरीनं त्याच्या पार्टनर्सला मिनियन्स असे म्हटले होते. या पॉइंटवर ओरीनं अशा लोकांवर निशाणा साधला जे त्याच्यावर मीम्स तयार करतात. ओरीनं म्हटलं आहे की, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर मीम्स तयार करता, पण मला माझा पैसा मिळतो आहे. मी त्यातून पैशांची कमाई करतो आहे. अशा शब्दांत ओरीनं प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com