Oscars 2023:माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगांनी का घातली होती हुज्जत..वाचा किस्सा

गुनीत मोंगा यांच्या कवी या शॉर्ट फिल्मला जेव्हा ऑस्कर नामांकन मिळालं होतं तेव्हाचा एक किस्सा सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Oscar 2023 Guneet Monga
Oscar 2023 Guneet MongaEsakal

Oscars 2023: तामिळ भाषेतील 'द एलिफंट व्हिस्पर्स' ने शॉर्ट फिल्म डॉक्युमेंट्री कॅटॅगरीत ऑस्कर पुरस्कार आपल्या नावावर करून घेतला आहे. सिनेमानं ऑस्कर पुरस्कार पटकावल्यानंतर निर्माती गुनीत मोंगानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुस्कारासोबत आपला फोटो शेअर केला आहे. कार्तिकी गोंजाल्विस दिग्दर्शित आणि गुनीत मोंगा निर्मित 'द एलिफंट व्हिस्परर्स' या नेटफ्लिक्स शॉर्टफिल्मनं 'हाऊ डू यू मेजरमेंट ए ईयर?', 'द मार्था मिशेल इफेक्ट' आणि 'स्ट्रेंजर एट द गेट' या शॉर्टफिल्म्सना मात दिली आहे.

गुनीत मोंगानं आपला आनंद व्यक्त करत लिहिलं आहे की,''हा माझ्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही दोन भारतीय महिला या ऐतिहासिक विजयाला या जागतिक मंचावर अनुभवत आहोत. मला या सिनेमाचा, या क्षणाचा आणि सिख्या एंटरटेन्मेंटच्या माझ्या अद्भूत टीमचा खूप गर्व वाटत आहे. भारताच्या एका स्वतंत्र प्रॉडक्शन हाऊसनं ऑस्कर जिंकणारा हा पहिला भारतीय सिनेमा आहे ज्यानं इतिहास रचला आहे. याक्षणी माझं मन आनंद,प्रेम आणि उत्साहानं भारलेलं आहे''.

गुनीत मोंगा पुढे म्हणाल्या,''मी कार्तिकीची खूप आभारी आहे..तिचा दृष्टिकोन खूप दूरदर्शी आहे. नेटफ्लिक्सनं आम्हाला खूप मोठा मंच उपल्ब्ध करून दिला..आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला सहकार्य केलं. महिलांचे भविष्य या कलाक्षेत्रात आता उज्ज्वल आहे असं वाटत आहे''.(Oscar 2023 Gunit Monga kavi short film president pratibhatai patil oscar story)

Oscar 2023 Guneet Monga
Oscars 2023: 'नाटू नाटू' ला ऑस्कर अन् भारतात आनंदाला पूर.. पुरस्कार मिळाल्यावर काय म्हणाले संगीतकार एम एम कीरावानी?.

अशा शब्दात आपला आनंद व्यक्त करणाऱ्या ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनित मोंगा यांचा स्ट्रगल खरंतर खूप मोठा आहे. 'लंचबॉक्स','गॅंग्ज ऑफ वासेपूर','मसान','गर्ल इन द येलो बूट्स','जल्लीकट्टू','पिरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स पगलेट' या ऑफबीट सिनेमांना करण्यात मोंगा यांचा महत्त्वाचा वाटा आहे. चला,गुनीत मोंगा यांच्या याआधीच्या ऑस्कर वारी आणि त्यामागच्या स्टोरीसंदर्भात जाणून घेऊया.

गुनीत मोंगा मूळच्या दिल्लीच्या. लहानपणापासूनच सिनेमाचं वेड त्यांना होतं. पण यापलिकडे जाऊन त्यांचा इंट्रेस्ट होता तो सिनेमा कसा बनवतात ते त्याच्या निर्मितीची संपू्र्ण प्रक्रिया कशी असते हे जाणून घेण्यात.

गुनीत मोंगा यांनी खूप कमी वयात म्हणूनच प्रॉडक्शन हाऊसेसमध्या कोर्डिनेटर इंटर्न म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण ही इंटर्नशीप करता करता गुनीत मोंगा यांनी मास कम्युनिकेशनसाठी देखील प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाचा त्या सिनेमांशी जोडल्या गेल्या.

गुनित मोंगा यांनी सुरुवातीच्या काळात पैशाची प्रचंड तंगी जाणवली. पण त्यातूनही त्यांनी आपलं स्वतःचं सिख्या एंटरटेन्मेंट हे प्रॉडक्शन हाऊन सुरू केलं. त्यांनी एक सिनेमा बनवला ज्यात बालकामगाराची आणि त्याच्या संघर्षमय विश्वाची साधी सोपी कहाणी यात सांगण्यात आली होती.

सिनेमाचं प्रॉडक्शन गुनीत मोंगांचे होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की हा 'कवी' सिनेमा ऑस्करच्या स्टुडण्ट सेक्शनमध्ये विजयी ठरला. तसंच. अकादमीच्या शॉर्ट फिल्म सेक्शनमध्ये देखील याला नामांकन मिळालं.

Oscar 2023 Guneet Monga
Oscars 2023: नाटू नाटू गाण्याविषयी माहित नाहीय?.. दीपिकानं थोडक्यात मांडला RRR चा इतिहास अन् सभागृह गेलं दणाणून..
Kavi Short Film
Kavi Short FilmGoogle

गुनीतला आता ऑस्करची स्वप्न पडू लागली. तिला तिथला भारावलेला तो माहोल सतत डोळ्यासमोर दिसायचा. पण म्हणतात ना अडचण नाही आली वाटेत तर ते सुख कसलं. गुनीतला ऑस्करचं निमंत्रण तर मिळालं पण तिथे जाण्यासाठी लागणारे पैसे मात्र तिच्याकडे नव्हते. त्यात आई-वडीलांचे निधन झालेले आणि त्यांचे दिल्लीतील दुकानही विकून टाकले होते.

गुनीत मोंगा यांनी मदतीसाठी अनेक बड्या व्यावसायिकांना मेल केले...पण कोणाचाच रिप्लाय आला नाही. आता जाण्यासाठी काहीच दिवसं उरले असताना तिला एक मेल आला जो होता भारताच्या राष्ट्रपतींकडून.

गुनीत यांना वाटले आता ऑस्करला जायला मिळो न मिळो कमीत कमी राष्ट्रपती भवनात सन्मान मिळतोय तो देखील तितकाच मोठा आहे,तेव्हा जायला हवं.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून गुनीत मोंगा यांना बोलावणे आले होते,जिथे राष्ट्रपती गुनीत यांची ती शॉर्टफिल्म पाहणार होत्या. गुनीत तिथे वेळेत पोहोचल्या पण अचानक राष्ट्रपतींना कामामुळे बाहेर जावे लागणार असल्यानं त्या गुनीत यांची शॉर्ट फिल्म पाहू शकणार नव्हत्या.

मग गुनीत यांनी थेट राष्ट्रपतींशी यावरनं वाद घालायला सुरुवात केली..त्या म्हणाल्या,''आम्हाला इतकं दूर बोलावून तुम्ही जाऊच कसे शकता?''

तेव्हा गुनीत यांना राष्ट्रपतींच्या कर्मचारी वर्गानं खूप समजावलं पण त्या काही ऐकण्याच्या तयारीत नव्हत्या. त्यावेळी तत्कालीनं विज्ञान तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रपती भवनात आले होते. त्यांनी सगळा गोंधळ पाहिला आणि गुनीतला शांत केलं प्रकरण विचारलं. आणि आपल्या मित्रांसोबत गुनीतचा सिनेमाही पाहिला. आणि गुनीतची अडचण समजून घेऊन तिला अमेरिकेला जाण्यासाठी मदतही केली.

Oscar 2023 Guneet Monga
Oscars 2023 Live: अँड द ऑस्कर गोज टू.. RRR चित्रपटातील Natu Natu गाण्याला ऑस्कर, टाळ्या आणि शिट्ट्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com