Oscar 2023: RRR नं रचला इतिहास..नाटू नाटू गाण्याची ऑस्करमध्ये एन्ट्री... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naatu Naatu From RRR Movie

Oscar 2023: RRR नं रचला इतिहास..नाटू नाटू गाण्याची ऑस्करमध्ये एन्ट्री...

Oscar 2023 News: जगातील सर्वात प्रतिष्ठित अकादमी पुरस्काराची (ऑस्कर पुरस्कारश) प्रत्येक सिनेप्रेमी वाट पाहत असतो.13 मार्च 2023 रोजी ऑस्कर विजेत्या चित्रपटांची घोषणा होणार आहे.ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. आता ऑस्कर-2023 ची नामांकन यादी जाहीर केली आहे.

ऑस्कर हा चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. यंदाचा ऑस्कर भारतासाठीही खूप खास आहे कारण एसएस राजामौलीचा आरआरआर, पान नलिनचा छेलो शो, शौनक सेनचा ऑल दॅट ब्रेथ आणि कार्तिक गोन्साल्विसचा द एलिफंट व्हिस्पर्स यासह चार भारतीय चित्रपट 2023 साठी निवडण्यात आले आहेत. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' या फूट-टॅपिंग ट्रॅकने मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे.

SS राजामौली यांच्या RRR व्यतिरिक्त, शौनक सेनचा डॉक्युमेंटरी फीचर फिल्म 'ऑल दॅट ब्रीड्स' देखील यावेळी ऑस्कर पुरस्कार 2023 साठी नामांकन करण्यात आला आहे. याशिवाय दिग्दर्शक गुनीत मुंगी यांच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' या डॉक्यूमेंट्रीला शॉर्ट फिल्मसाठी नामांकन मिळाले आहे. देशातील तीन चित्रपट ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीत आले आहेत ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे.

हेही वाचा: Pathaan: गुजरातमधून 'पठाण' साठी गूडन्यूज..बजरंग दलाचा विरोध बदलला समर्थनात..कोणी फिरवली सूत्र?

RRR हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील वीएफएक्स, चित्रपटाचं कथानक आणि चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आरआरआरचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे. यामध्ये राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण, श्रिया सरन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींहून अधिक कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले.