Oscars 2023: तब्बल 21 वर्षांनी हे घडतंय..ऑस्करसाठी भारतानं फक्त दोनच नाहीत, तर इतकी नामांकनं पटकावली..

यंदा भारतीय वेबसिरीज,शॉर्टफिल्म्सनी देखील ऑस्करला आपली दखल घ्यायला भाग पाडलंय.
Oscar 2023: Webseries All The Breathes and The Elephant Whisperers shortlisted for oscar from india
Oscar 2023: Webseries All The Breathes and The Elephant Whisperers shortlisted for oscar from indiaGoogle

Oscars 2023: तब्बल २१ वर्षानंतर भारताला ऑस्करसाठी एक-दोन नाहीत तर चक्का ४ नामांकनं मिळाली आहेत,आणि हा खूप मोठा गौरवाचा क्षण आहे. आरआरआर सिनेमातील 'नाटी नाटू' गाण्याला ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीसाठी निवडलं गेलं आहे तर 'छेल्लो शो' सिनेमाला इंटरनॅशनल फिल्म कॅटेगरीत शॉर्टलिस्ट केलं गेलं आहे.

या दोन सिनेमां व्यतिरिक्त दोन डॉक्युमेन्ट्रीज देखील जोरदार चर्चेत आहेत ते त्यांची ऑस्करसाठी निवड झाल्यामुळे. दिग्दर्शक शौनक सेनच्या All The Breathes आणि The Elephant Whispers अशी अनुक्रमे त्या डॉक्युमेन्ट्रीजची नावं आहेत.

आता यापैकी कोण ऑस्कर पटकावतं हे थोड्या दिवसांत कळेलच. पण सध्या आपण जाणून घेऊया ऑस्कर नामांकन मिळालेल्या त्या दोन भारतीय डॉक्युमेन्ट्रीज विषयी. (Oscar 2023: Webseries All The Breathes and The Elephant Whisperers shortlisted for oscar from india)

Oscar 2023: Webseries All The Breathes and The Elephant Whisperers shortlisted for oscar from india
Vivek Agnihotri: सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात मॉर्निंग वॉकला निघालेले अग्निहोत्री ट्रोल, लोक म्हणू लागले...

All The Breathes विषयी बोलायचं झालं तर, शौनक सेनच्या या शॉर्ट फिल्मला ऑस्कर्स मध्ये डॉक्यमेन्ट्री फिचर फिल्म कॅटेगरीत निवडलं गेलं आहे. या डॉक्युमेन्ट्रीत दिल्लीचे दोन भाऊ मोहम्मद सऊद आणि नदीम शहबाज यांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. यामध्ये दाखवलं गेलंय की हे दोघे दिल्लीमध्ये वजीराबाद येथील घारींचे संवर्धन कसे करतात आणि त्यांच्यावर कसे उपचार करतात. दिल्लीच्या इको सिस्टीमवर तिथल्या प्रदूषणाचा आणि वाढत्या लोकसंख्येचा कसा परिणाम झालाय हे देखील यामध्ये दाखवण्यात आलंय. ९० मिनिटाच्या या डॉक्युमेन्ट्रीनं कान्स फेस्टिव्हल २०२२ मध्ये आपलं नाव याआधीच दणाणून सोडलं आहे. याव्यतिरिक्त कितीतरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये All That Breathes ची चर्चा रंगलेली पहायला मिळालीय. तसंच, दिग्दर्शक शौनक सेनने या डॉक्युमेन्ट्रीसाठी कान्समध्ये गोल्डन अॅवॉर्डही जिंकलं होतं.

The Elephant Whisperers या डॉक्युमेन्ट्रीला शॉर्ट फिल्म कॅटेगरीत शॉर्टलिस्ट केलं गेलंय. ४१ मिनिटाच्या या शॉर्ट फिल्मला नेटफ्लिक्सवर दाखवलं गेलं होतं. डॉक्युमेन्ट्रीची कथा एका वयस्क जोडप्यावर आधारित आहे,जे रघु नावाच्या एका अनाथ हत्तीला दत्तक घेतात आणि त्याचे संगोपन करतात. हे जोडपं रघुच्या अस्तित्वाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. फक्त त्याचे संरक्षणच हे जोडपं करत नाही,तर देव मानून त्याची पूजा देखील करतात. या कथानकानं अनेकांच्या मनाला स्पर्श केला होता. माणूस आणि प्राण्यां मधील निस्वार्थी प्रेमाला दाखवण्यात आलं होतं.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

The Elephant Whisperers ८ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती आणि आता आपण ओटीटीच्या माध्यमातून या डॉक्युमेन्ट्रीला पाहू शकतो. तर All That Breathes सध्या ओटीटीवर उपलब्ध नाही,पण बोललं जात आहे की लवकरच नेटफ्लिक्सवर ही स्ट्रीम केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com