'आपणही काही कमी नाही, तुम्ही तर...' शहेनशहाकडून राजामौलींचं कौतूक!| Oscar 2023 RRR | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar 2023 RRR

Oscar 2023 RRR : 'आपणही काही कमी नाही, तुम्ही तर...' शहेनशहाकडून राजामौलींचं कौतूक!

Oscar 2023 RRR Movie : केवळ भारतातच नाहीतर साऱ्या जगानं एस एस राजामौली यांच्या RRR वर कौतूकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून RRR च्या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळणार की नाही याविषयी चर्चा सुरु होती. अखेर काल ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आणि भारतात उत्साहाला उधाण आले होते.

९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटूनं ऑस्करवर आपली मोहोर उमटवली. खरं तर भारताच्या दोन कलाकृतींनी ऑस्कर मिळवत आपली वेगळी ओळख जागतिक पातळीवर निर्माण केली आहे. माहितीपट गटातून द एलिफंट व्हिस्परला ऑस्कर मिळाल्यानं चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. यासगळ्यात बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटींनी राजामौली आणि त्यांच्या टीमचे कौतूक केले आहे. त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

ज्युनिअर एनटीआर, रामचरण यांच्या प्रभावी नृत्यानं देशाला प्रभावित केले होते. ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये नाटू नाटू गाण्याचे सादरीकरणही झाले. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. स्टँडिंग ओव्हेशन देत प्रेक्षकांनी या गाण्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. यासगळ्यात बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यांनी राजामौलींचे कौतूक केले आहे.

बिग बी यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बच्चन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लोकं भलेही आपल्याला कमी समजत असतील पण आपण दाखवून दिलं आहे की आपणही काही कमी नाही. आपण जिंकलो याचा खूप आनंद आहे. सगळ्या देशाला आनंदित करण्याचे काम राजामौलींनी केले आहे. भारताचा झेंडा गर्वानं उंचावण्याचे काम नाटू नाटू्या निमित्तानं झालं आहे. असेही बिग बी यांनी म्हटले आहे.