
मुंबई - कोरोनाचं सावट गेल्या वर्षीही ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्य़ावर होतं. यंदाही ही परिस्थिती कायम आहे. केवळ ऑस्करच नाही तर कान्स, ग्रॅमी अॅवॉर्डवर देखील कोरोनाचं संकट होत. यामुळे हे पुरस्कार सोहळे अतिशय साधेपणानं पार पडले. पुरस्कार विजेत्यांची नावं ऑनलाईन रिलिज करण्यात आली होती. अमेरिकेत तर कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. तो रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचेही दिसून आले आहे. विशेषत मनोरंजन क्षेत्रावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे. आतापर्यत अनेक सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. हॉलीवूडमधील सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण होऊन त्यांनी चाहत्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सध्या ऑस्कर पुरस्कारांची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जॉन्सन यांनी यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या नॉमिनेशनची घोषणा केली होती. ऑनलाईन पध्दतीनं त्यांनी जाहीर केलेल्या या नामांकनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरवेळी संभाव्य विजेत्या चित्रपटांची चर्चा होत असते. यावर्षी द फादर या सिनेमाची चर्चा आहे. अनेकांनी हा चित्रपट सर्वोत्कृष्ठ चित्रपटांच्या यादीत प्रबळ दावेदार मानला जात आहे. द फादर यापूर्वी जगातील निवडक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र आता तो भारतातही प्रदर्शित होणार आहे. त्याची माहिती चित्रपटाच्या प्रसिध्दी विभागानं दिली आहे. सोशल मीडियावर त्याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
हॉलीवूडमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर भारतीय प्रेक्षकांना या चित्रपटाचे वेध लागले होते.
भारतात हा चित्रपट 23 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनं दिली आहे. तरणनं लिहिलं आहे की, अॅकडमी अॅवॉर्ड नॉमिनेटेड द फादर 23 एप्रिलला भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एंथनी हॉपकिन्स आणि ओलिविया कोलमन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या फ्लोरियन जेलर यांच्या नाटकावर आधारित आहे.
चित्रपटात असे दाखवण्यात आले की, एंथनी (हापकिन्स) मुलगी (कोलमन) आणि इतरांशी बोलतो. ती पात्रं त्याला त्याच्या भुत आणि वर्तमान काळाचा परिचय करुन देत असतात. त्यावेळी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक कोडं होऊन जातो. नक्की खरं काय आहे आणि कुणावर विश्वास ठेवायचा असा त्यांना पडतो. या चित्रपटानं बेस्ट फिल्म नॉमिनेशनच्या यादीत आपलं नावं समाविष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.